मुंबई : राज्यात मंगळवारी १३ मृत्यू नोंदले आहेत. यातील सात मृत्यू हे गेल्या आठवडय़ातील असल्याचे स्पष्ट करून मृत्यूची नोंद उशिरा झाल्याने एका दिवसात १३ मृत्यू जाहीर केल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

राज्यात गेले काही दिवस मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. सरासरी दैनंदिन मृतांची संख्या पाचपेक्षाही अधिक झाली होती; परंतु मागील दोन दिवस मृतांच्या संख्येत घट झाल्याचे आढळले, तर सोमवारी शून्य मृत्यू नोंदले गेले. मृत्यूच्या नोंदी उशिराने झाल्यामुळे मंगळवारी एकदम १३ मृत्यूंची नोंद झाल्याचे दिसत आहे. पुण्यामध्ये तीन, उल्हासनगर मनपामध्ये दोन, तर ठाणे मनपा, कल्याण-डोंबिवली मनपा, वसई-विरार मनपा, पनवेल मनपा, नाशिक मनपा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला. मंगळवारी नोंदलेल्या मृतांमध्ये पाच मृत्यू ४८ तासांतील आहेत, तर सात मृत्यू गेल्या आठवडय़ातील आहेत. बुधवारी राज्यभरात २,४३५ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर २,८८२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत ४२० नव्या बाधितांची नोंद 

करोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असून मंगळवारी ४२० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या ११ लाख १९ हजार ४५० वर पोहोचली आहे, तर दिवसभरात शून्य मृत्यू झाले. दिवसभरात ६५९ रुग्णांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ९६ हजार ५०८ रुग्णांनी करोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ३ हजार  ३१८ उपचाराधीन रुग्ण आहेत. मंगळवारी २५ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्यातील पाच जणांची स्थिती गंभीर आहे.

Story img Loader