मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विक्रम नोंदविला. दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत नऊ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
एवढ्या मोठ्या संख्येने एका दिवसात लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
आणखी वाचा
मुंबईत शनिवारी २ लाख १९ हजार ७२७ लसीकरण झाले. पहिल्यांदाच मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले.