|| इंद्रायणी नार्वेकर
दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या ९७ टक्क्यांवरच
मुंबई : सर्वाधिक लसीकरण पूर्ण केलेल्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक आघाडीवर आहे. मात्र असे असले तरी १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात मुबईला अद्याप यश आलेले नाही. दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या अद्याप ९७ टक्क्यांवरच घुटमळत आहे. पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट गाठले त्याला ८४ दिवस उलटून गेले असले तरी अद्याप दुसऱ्या मात्रेचे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागानेच आता नागरिकांपर्यंत जाण्याचे ठरवले आहे.
मुंबई महानगरपालिकेने पहिल्या लसमात्रेचे तब्बल ११४ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मात्र दुसरी लस घेणाऱ्या नागरिकांचे उद्दिष्ट गाठताना ‘हत्ती गेला, पण शेपूट जाईना’ अशी अवस्था पालिकेची झाली आहे. २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले होते. मात्र फेब्रुवारी संपत आला तरी लसीकरण पूर्ण होऊ शकलेले नाही. मुंबईमध्ये ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे करोना लसीकरणाचे उद्दिष्ट जनगणनेच्या आधारे निर्धारित करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत १ कोटी ५ लाख नागरिकांनी म्हणजेच ११४ टक्के नागरिकांनी दोन्ही मात्रा पूर्ण केल्या आहेत. तर केवळ ९० लाख ८ हजार ४०२ नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे.
जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे करोना लसीकरण (दोन्ही मात्रा मिळून) करावयाचे आहे. ९२ लाख नागरिकांना पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने नोव्हेंबर महिन्यातच पूर्ण केले होते. मात्र दुसऱ्या मात्रेच्याबाबत अद्याप हे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट पूर्ण करून ८४ दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे हा कालावधी विचारात घेता १६ फेब्रुवारीला हे उद्दिष्ट पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र त्यात पालिकेला अद्याप यश आलेले नाही. १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेने आता नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात येत होते. आता पालिकेने विविध शिबिरांच्या माध्यमांतून, दहीहंडी व गणपती मंडळांच्या, शाळा,महाविद्यालयांच्या माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे ठरवले आहे. येत्या चार-पाच दिवसांत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘मुंबईबाहेरील लाभार्थीचाही समावेश’
मुंबईत होणाऱ्या लसीकरणात मुंबईबाहेरील नागरिकांचादेखील समावेश आहे. त्यामुळे पहिल्या मात्रेचे ९२ लाखांचे लक्ष्य पूर्ण केल्यानंतरही अद्यापही पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मधल्या काळात मुंबईबाहेरचे नागरिक लस घ्यायला मुंबईत येत होते. त्यामुळे पालिकेने पहिल्या मात्रेच्या उद्दिष्टय़ाहून अधिक लसीकरण केले आहे. मात्र यापैकी अनेकांनी नंतर आपापल्या जिल्ह्यात लस घेतली असावी, अशी शक्यता अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली.
दोन कोटींचा टप्पा
मुंबईत शनिवापर्यंत एकूण लसमात्रा घेतलेल्यांची संख्या १ कोटी ९९ लाखांच्या पुढे गेली आहे. यात पहिली मात्रा, दुसरी मात्रा, वर्धक मात्रा यांचा समावेश आहे. सध्या दरदिवशी २७ हजारांपर्यंत लोकांचे लसीकरण दरदिवशी होते आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसांत लसीकरणाचा दोन कोटींचा टप्पा महापालिका पूर्ण करणार आहे.