पालिकेला गेल्या दहा दिवसांत केवळ १ लाख ४९ हजार मात्रा

मुंबई: शहरात एकीकडे रेल्वे प्रवास करता यावा यासाठी रात्रीपासून रांगा लावून लस घेण्यासाठी नागरिक धडपडत असताना लसच उपलब्ध नसल्याने गेल्या पंधरा दिवसांत लसीकरणात ६४ टक्यांनी घट झाली आहे. पालिकेला गेल्या दहा दिवसांत केवळ १ लाख ४९ हजार मात्रा मिळाल्या असून त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये लसीकरणात घट झाल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पालिकेला १० ऑगस्टपर्यंत १ लाख ४९ हजार मात्रा मिळाल्या. यात कोव्हिशिलडच्या १ लाख १ हजार आणि कोव्हॅक्सिनच्या ४८ हजार मात्रा मिळाल्या. लशींचा साठा नसल्यामुळे पालिकेला ४ ऑगस्टला लसीकरण बंद ठेवावे लागले, तर मंगळवारीही अपुरा साठा असल्यामुळे केवळ ५३ लसीकरण कक्ष कार्यरत होते. या दिवशी शहरात ५७८५ नागरिकांना लस देण्यात आली.

मुंबईत २८ जुलै ते ३ ऑगस्ट या आठवड्यात सुमारे १ लाख २५ हजार नागरिकांनी पहिली, तर सुमारे ७४ हजार नागरिकांनी दुसरी मात्रा दिली गेली. या आठवडयात सुमारे १ लाख ९९ हजार जणांचे लसीकरण झाले. परंतु साठाच कमी आल्यामुळे ४ ते १० ऑगस्ट या आठवड्यात मात्र लसीकरणाचा वेग मंदावला. या कालावधीत के वळ ४६,०२६ नागरिकांना पहिली तर २५,२३९ नागरिकांना दुसरी मात्रा मिळाली. परिणामी एकूण ७१,२६५ जणांचे लसीकरण होऊ शकले.

खासगीमध्ये दुपटीने लसीकरण

खासगी रुग्णालयात एकूणच लसीकरणात गेल्या काही दिवसापासून घट होत आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुमारे १ लाख ६४ हजार, चौथ्या आठवड्यात सुमारे १ लाख ५१ हजार आणि ऑगस्टमधल्या आठवड्यात तर ही संख्या सुमारे १ लाख ३५ हजारापर्यंत घसरली. परंतु पालिकेला ऑगस्टमध्ये साठाच कमी मिळाल्यामुळे पालिकेच्या केंद्राच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये मात्र दुपटीहून अधिक लसीकरण झाले आहे. खासगी केंद्रांवर या आठवड्यात ९६,१२७ जणांनी पहिली तर ३९,७२६ जणांनी दुसरी मात्रा घेतली.