राज्यामध्ये होणारा करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्यामध्ये एपीडमीक अॅक्ट १९४५ नुसार सरकारने काही सूचना जारी करत आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये काही महत्वाच्या घोषणा केल्या. या बारा घोषणा पुढीलप्रमाणे…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • राज्यामध्ये एकूण १७ रुग्ण अढळून आले आहेत. यामध्ये मुंबईत तीन, ठाण्यात एक, नागपूरमध्ये एक आणि पुण्यात दहा रुग्ण आहेत.
  • सर्व रुग्णांची लक्षणे ही सौम्य स्वरुपाची आहे.
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा पुढील सुचना मिळेपर्यंत बंद राहणार. मुंबई-ठाण्यांमधील शाळांबद्दल सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेले नाही.
  • शक्य असेल तिथे घरुन काम करण्याची मूभा म्हणजेच वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी.
  • मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमधील थेअटर्स, स्वीमींगपूल, जीम बंद ठेवण्याचे आदेश.
  • सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे टाळावे.
  • आज मध्यरात्रीपासून निर्णय लागू होणार.
  • अनावश्यक प्रवास जनतेने टाळावा.
  • मॉल, हॉटेल सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र अशा ठिकाणे जाणे टाळावे.
  • सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणारे कार्यक्रम टाळावे. अशा राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी परवाणगी मिळणार नाहीत. तसेच याआधी परवानगी मिळाली असेल तर ती रद्द केली जाईल.
  • बस आणि रेल्वे या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या बंद करता येणार नाहीत. त्यामुळे या सेवा चालू राहणार.
  • दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरुच राहणार. इतर परिक्षा पुढे ढकलण्याचा विचार सुरु.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus maharashtra cm uddhav thackeray 12 important announcements scsg