एका टेम्पोमालकाकडून ८१ हजारांची लाच घेताना पालिकेचे पर्यवेक्षी निरीक्षक संदीप नागरे आणि एजंट मुकेश ठाकूर या दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली. फिर्यादीचा जप्त माल परत करण्यासाठी या दोघांनी ही लाच मागितली होती. या प्रकरणातील फिर्यादीचा टेम्पो २१ नोव्हेंबर रोजी माल भरून मुंबईकडे येत असताना जकात नाक्यावर तो अडविण्यात आला. हा टेम्पो नंतर पालिकेच्या कांदिवली येथील यार्डात ठेवण्यात आला होता. हा माल सोडविण्यासाठी ८० हजार रुपये द्यावे लागतील, असे जकात एजंट भरत ठाकूर याने फिर्यादीला सांगितले होते. त्यामुळे फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार होती.

Story img Loader