दोन हजार मेट्रिक टन ‘कोल्डमिक्स’ तयार; दरवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत रस्ते सुस्थितीत

इंद्रायणी नार्वेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : दरवर्षी पावसाळय़ासोबत अवतरणारे रस्त्यांवरील खड्डे पुढील चार-पाच महिने चर्चेचा विषय बनतात. मात्र, यंदा जूनचा पंधरवडा लोटल्यानंतरही मुंबईतील रस्ते सुस्थितीत दिसत असल्याचे निरीक्षण सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदवले आहे. खड्डय़ांबाबत पालिकेकडे आतापर्यंत २१६ तक्रारी आल्या असून त्यापैकी ११९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. तसेच पावसामुळे पडणारे खड्डे तातडीने बुजवता यावेत, याकरिता पालिकेने दोन हजार मेट्रिक टन कोल्डमिक्सचे उत्पादन करून ते सज्ज ठेवले आहे.

आंतरराष्ट्रीय शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईचे खड्डय़ांनी भरलेले रस्ते हे सार्वत्रिक चेष्टेचा आणि टीके चा विषय होतात. यावरून मुंबई महापालिका कायम लक्ष्य ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत पालिकेने रस्त्यांच्या सुधारणेवर भर दिला असून रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर भर दिला आहे. त्यामुळे यंदा रस्त्यांवर खड्डे दिसू लागले असले तरी, गतवर्षीच्या तुलनेत त्यांचे प्रमाण कमी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

खड्डे बुजवण्यासाठी पालिके ने त्रिस्तरीय यंत्रणा तयार ठेवली आहे. त्यात २४ विभाग कार्यालयात रस्ते विभागांतर्गत असलेल्या कामगारांकडून त्या त्या विभागातील खड्डे बुजवण्याची कामे करवून घेतली जाणार आहेत. सात परिमंडळाच्या पातळीवर प्रत्येकी एक कं त्राटदार गेल्या वर्षीपासून नियुक्त करण्यात आला आहे. खड्डे बुजवण्याबरोबरच रस्त्यावरील मोठय़ा आकाराच्या खडबडीत पट्टय़ा (बॅड पॅच) बुजवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्यावर खड्डे आढळल्यास ते भरण्याची जबाबदारी त्या कं त्राटदारांवर असेल. ज्या रस्त्यांचा पाच वर्षांचा हमी कालावधी संपलेला नाही अशा रस्त्यांवरील खड्डय़ांची दुरुस्तीही त्याच कं त्राटदारांकडून करून घेतली जाणार आहे. दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक असलेले कोल्डमिक्सचे मिश्रण कमी पडल्यामुळे अनेक ठिकाणी दगड, विटा, पेव्हर ब्लॉक यांनी खड्डे बुजवलेलेही दिसतात. मात्र या वर्षी रस्ते विभागाने जास्त कोल्डमिक्स तयार ठेवले आहे.

कार्यकर्ते समाधानी

‘पॉटहोल वॉरियर’ या सामाजिक संस्थेचे मुश्ताक  अन्सारी यांच्या मते मुंबईतील खड्डे ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाले आहेत. मुश्ताक हे दरवर्षी आपल्या संस्थेच्या मार्फत खड्डे बुजवण्याचे काम करतात. तसेच खड्डय़ांबाबतच्या तक्रारी करून खड्डे पालिके च्या निदर्शनास आणून देण्याचेही काम करतात. यंदा अंधेरी लिंक रोड परिसरात, मालाड, कांदिवली, विक्रोळी, सायन या परिसरात अद्याप खड्डे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र शहर भागातील खड्डे खूप कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

खड्डे बुजवण्यासाठी पालिके ने यावेळी पूर्ण तयारी के ली आहे. कोल्डमिक्स कमी पडू नये म्हणून दोन हजार मेट्रिक टनापेक्षाही अधिक कोल्डमिक्सचे उत्पादन करण्यात आले असून हे उच्च दर्जाचे मिश्रण आहे. त्यापैकी १७०० मेट्रिक टन कोल्डमिक्स विभागीय कार्यालयांना वितरित करण्यात आले आहे.

–  राजेंद्रकुमार तळकर, पालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा)

खड्डय़ांच्या तक्रारी करण्यासाठी पर्याय

  • दूरध्वनी क्रमांक १९१६
  • ट्विटरवर @mybmc
  • प्रशासकीय विभागातील अभियंत्यांच्या मोबाइल क्रमांकांवर
  • ‘पॉटहोल फिक्सिट अ‍ॅप’वर