उल्हासनगरच्या माधव कम्पाऊंडजवळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरील फलक काढण्याची कारवाई केल्यामुळे संतापलेले माजी आमदार व नगरसेवक सुरेश ऊर्फ पप्पू कलानी यांनी आपल्या १० ते १२ समर्थकांसह सोमवारी संध्याकाळी दोन पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पप्पू कलानी व त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पालिकेतील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाचे साहय्यक आयुक्त युवराज भदाणे, डॉ. सागर घोलप अशी मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. भदाणे यांनी सांगितले, माधव कम्पाऊंडजवळील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरील फलक काढण्याची कारवाई आम्ही संध्याकाळी केली. त्यानंतर आम्ही उल्हासनगर कॅम्प एकजवळ चहा पीत असताना पप्पू कलानी तेथे १० ते १२ समर्थकांसह आले. कलानींनी आमच्याबरोबर केलेल्या कारवाईबाबत विचारणा करून हुज्जत घालून मारहाण केली. मात्र, अनधिकृत बांधकामाच्या विषयावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येते. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा