बदलापूर नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून मतदान केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील भगत यांचे नगरसेवकपद रद्द केले असून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.२३ डिसेंबर २०११ रोजी बदलापूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद तेली आणि शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्यामध्ये लढत झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भगत आणि भाजपच्या सविता गवारी यांनी पक्षादेश झुगारून शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना मतदान केले होते. याविरुद्ध ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलारासु यांच्याकडे सुनावणी सुरू होती. जिल्हाधिकारी पी. वेलरासु यांनी सुनील भगत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले असून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा