बिलही करदातेच भरणार!
महानगरपालिकेतील सर्व २३२ नगरसेवकांना (२२७ + ५ स्वीकृत) आता महापालिकेकडून मोबाईल मिळणार आहेत. या आशयाचा प्रस्ताव बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर झाला असून त्यासाठी २५ लाख रुपये निधीची तरतूदही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकांचे प्रत्येक महिन्याचे १२५० रुपयांपर्यंतचे देयकही करदात्यांच्याच खिशातून भरले जाणार आहे.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांचे फोटो काढून ते तात्काळ महापालिकेच्या संकेत स्थळावर अपलोड केले जात होते. त्यामुळे २४ तासांच्या आत तो खड्डा भरण्याची जबाबदारी संबधित ठेकेदारासह अधिकाऱ्याची होती. त्यामुळे नगरसवेकांनाही मोबाईल द्या आणि तेही फोटो काढतील, अशी सूचना काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये स्थायी समिती अध्यक्षांनी हा प्रस्ताव मांडला आणि त्याला सर्वपक्षीय गटनेत्यांनी मंजुरीही दिली आहे. त्यामुळे नगरसेवक या मोबाईलवरून कचऱ्याचे, रस्त्यावरील खड्डय़ांचे फोटो अपलोड करतील, असे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा