मुख्यमंत्री कार्यालयाला पाच हजार कोटींचा मलिदा; राधाकृष्ण विखे यांचा गंभीर आरोप
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईच्या विकास आराखडय़ात नियमबाह्य़ करण्यात आलेल्या बदलाचा सात-आठ बिल्डरांना एक लाख ते सव्वा लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. त्याबदल्यात मुख्यमंत्री कार्यालयाला दहा हजार कोटी रुपये देण्याचा सौदा झाला, त्यातील पाच हजार कोटी रुपये प्रत्यक्ष पोहोचले आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी विकास आराखडय़ात गेलेल बदल १५ जानेवरीपर्यंत रद्द केले नाहीत, तर सेबीकडे तक्रार केली जाईल, तसेच न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
मुंबईचा विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर त्यात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार आपण नागपूरमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात केली होती. या सरकारने पूर्वीच्या विकास नियंत्रण नियमावलीत (डीसीआर) नवीन प्रोत्साहन हा शब्द जोडला व त्याचे डीसीपीआर असा नामविस्तार केला. बिल्डरांच्या फायद्यासाठी ही प्रोत्साहन योजना आणली गेली. त्यासाठी डीसीआरमध्ये नियमबाह्य़ २५०० बदल करण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी फक्त १४ बदल करण्यात आल्याचे सांगितले. मात्र त्याचाही अभ्यास केला असता, त्या १४ बदलामध्ये १४०० प्रकारची आरक्षणे बदलली आहेत, अशी माहिती विखे यांनी दिली.
विखे-पाटील पितापुत्रांची राजकीय खेळी ?
‘लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळणार नसल्यास मी माझा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे किंवा ‘काँग्रेसमध्येच राहिले पाहिजे असे नाही’ अशी विधाने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांनी केल्याने विखे-पाटील यांना भाजपचे वेध लागल्याची चर्चा सुरू आहे. लगेचच दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप करून आपण पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत नाही, असा संदेश काँग्रेस नेतृत्वाला दिला.
लोकसभेच्या नगर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी सुरू केली. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. कै. बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवार यांच्यात कधीच सख्य नव्हते. दुसऱ्या पिढीतील राधाकृष्ण विखे-पाटील आणि अजित पवार यांच्यातही नेहमी कटुता असते. मुळा-प्रवरा वीज कंपनी अजित पवार यांच्यामुळे बंद पडल्याचा राग विखे-पाटील यांना आहे. या पार्श्वभूमीवर पवार नगरचा मतदारसंघ विखे-पाटील यांच्यासाठी सहजासहजी सोडण्याची शक्यता कमी आहे. अगदीच राहुल गांधी यांनी विनंती केली तरच पवार राजी होऊ शकतात, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.
विरोधी पक्षनेत्यांचा मुलगाच भाजपमध्ये जाण्याची भाषा करू लागल्याने त्याची काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी सकाळी विखे-पाटील यांना जाब विचारल्याचे पक्षातील सूत्राकडून सांगण्यात आले.