लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीत २० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराशी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली आहे.

‘मेटलडिहाइड’ कीटकनाशक २२५ रुपये किलो प्रमाणे उपलब्ध असताना १ हजार २७५ रुपये किलोच्या दराने सरकारने खरेदी केले. १ हजार ५० रुपये प्रतिकिलो जादा दराने १ लाख ९६ हजार ९४१ किलो कीटकनाशक कृषी विभागाने खरेदी केली. त्यामुळे राज्य सरकारला २० कोटी रुपयांचा फटका बसला. या संपूर्ण व्यवहाराशी संबंधित तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष कार्य अधिकारी वैभव पवार, कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, महामंडळाच्या लेखा आणि वित्त विभागाचे महाव्यवस्थापक सुजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय पाथरकर, उपमुख्यव्यवस्थापक देवानंद दुथडे यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Story img Loader