मुंबई : कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आर्किटेक्चर पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राज्याची स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित न करता केंद्रीय स्तरावरून कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरमार्फत घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश करण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एम.आर्च या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता एम. आर्च ही सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येत होती. मात्र २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून भारतातील आर्किटेक्चरल शिक्षणाचे नियमन करणारी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर या सर्वोच्च संस्थेमार्फत आर्किटेक्चर पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. एम. आर्च या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. त्यामुळे २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत स्वतंत्र प्रवेश परीक्षा आयोजित न करता केंद्रीय स्तरावरून कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरमार्फत घेण्यात येणाऱ्या आर्किटेक्चर पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा या सामाईक प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश करण्याचे प्रस्तावित होते. त्याअनुषंगाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एम.आर्च सीईटी २०२५ ही सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार नाही, तसेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून एम.आर्च या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता केंद्रिय स्तरावरून कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरमार्फत घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा लागू राहणार आहे. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये एम. आर्च या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात आले आहे. यंदा होणारी प्रवेश प्रक्रिया ही कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरमार्फत घेण्यात येणार आहे.

हेही वाचा : ७५ वर्षीय वृद्धाची ११ कोटींची सायबर फसवणूक, नामांकीत ब्रोकरच्या नावाने बनावट मोबाइल ॲप

राज्यामध्ये एम.आर्च या अभ्यासक्रमाच्या ६९० जागा आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ६९० जागांपैकी अवघ्या २१७ जागांवर प्रवेश झाले आहेत. दरवर्षी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Council of architecture entrance exam for m arch admission mumbai print news css