‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण केवळ गटनेत्यांना दिल्यामुळे सर्वच राजकीय पक्षंचे नगरसेवक रुसले आहेत. ज्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत, तेथील स्थानिक नगरसेवकांना तरी कार्यक्रमासाठी आमंत्रित करायला हवे होते, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. मात्र, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतून कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येत असताना नगरसेवकांनाच डावलण्यात आल्यामुळे पालिका सभागृहात या मुद्दय़ाला वाट मोकळी करुन देण्याच्या विचारात काही नगरसेवक आहेत. केवळ महापौर, सभागृह नेत्या, विरोधी पक्षनेते, वैधानिक आणि विशेष समित्यांचे अध्यक्ष, गटनेते यांना या कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यात आले आहे.
‘मेक इन इंडिया’चे निमंत्रण नसल्याने नगरसेवक रुसले
उपक्रमाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण केवळ गटनेत्यांना दिल्यामुळे सर्वच राजकीय पक्षंचे नगरसेवक रुसले
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 14-02-2016 at 00:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Councillors not invited in make in india programme