मुंबई : रोहन देशपांडे हे बिव्हेंट्रिक्युलर सहाय्यक उपकरण (बीआयव्हीएडी) वर उपचार घेतल्यानंतर देशातील पहिले असे रुग्ण ठरले आहेत की ज्यांची एकाचवेळी हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.

रोहन यांना इस्केमिक कार्डियोमायोपॅथी असल्याचे निदान झाले होते आणि हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांची नोंदणी करण्यात आली होती. प्री-ट्रान्सप्लांट चाचणी दरम्यान त्यांना आधीपासूनच ग्रेड ३ यकृत फायब्रोसिस असल्याचे आढळले. 

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
enior citizen declared brain dead and his liver donation saved persons life
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्ण मृत्यूनंतर दुसऱ्याला जीवदान देऊन गेला!
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
Pedestrian bridge unused due to inconvenience Municipal Corporation neglects maintenance
‘पाऊल’ अडते कुठे? असुविधांमुळे पादचारी पूल वापराविना; देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
Health Department Launches Campaign to Inspect Private Hospitals
आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम

योग्य दात्याची प्रतीक्षा करत असताना रोहन (नाव बदलून) यांच्या प्रकृतीत अधिक खालावली. त्यांना हृदयविकाराच्या लक्षणांसह मूत्रपिंडाच्या कामगिरीत घट झाली होती, ज्यामुळे त्यांना बाहेरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना स्थिर ठेवण्यासाठी इनोट्रोप्स आणि व्हॅसोप्रेसर्स यांसारख्या औषधांचा वापर केला गेला. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही, त्यामुळे त्यांना रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात हलविण्यात आले. 

डॉ. अन्वय मुळे यांच्या  नेतृत्वाखालील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रगत हृदय शस्त्रक्रिया विभागाने बिव्हेंट्रिक्युलर सहाय्यक उपकरण बसवण्याची महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांचे नाव राष्ट्रीय अतिआवश्यक प्रत्यारोपण यादीत समाविष्ट करण्यात आले. 

हेही वाचा >>> Kurla Bus Accident : कुर्ल्यात ब आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!

या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या हृदयाच्या डाव्या व उजव्या वेंट्रिकल्सला कृत्रिम यंत्राद्वारे सहाय्य केले जाते, आणि रुग्ण आयसीयूमध्ये राहतो जोपर्यंत प्रत्यारोपणासाठी हृदय उपलब्ध होत नाही.  हृदय प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करत असताना रोहन यांच्या यकृताच्या कार्यक्षमतेत घट झाली. त्यांचे बिलिरुबिन पातळी वाढू लागली आणि यकृताचा आजार गंभीर होऊ लागला. सखोल चर्चेनंतर असे ठरविण्यात आले की त्यांचे यकृत पुनर्प्राप्त होण्याची शक्यता फार कमी आहे आणि विलंब केल्यास त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांना यकृत प्रत्यारोपणासाठीही त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले. 

हेही वाचा >>> सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला

सुदैवाने, संयुक्त हृदय-यकृत प्रत्यारोपणासाठी योग्य दाता उपलब्ध झाला. पुण्यातील ३८ वर्षीय पुरुष दाता होता. मुंबई आणि पुणे पोलिस आणि विमानतळ अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे अवयवांना वेगाने हस्तांतरित करण्यात आले.  (ग्रिन कॉरिडॉर) परिणामी रोहन देशपांडे यांचे संयुक्त हृदय-यकृत प्रत्यारोपण सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडले. ही शस्त्रक्रिया डॉ. अन्वय मुळे (प्रगत हृदय शस्त्रक्रिया संचालक) आणि डॉ. रवी मोहांका (यकृत प्रत्यारोपण संचालक) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली, तर आयसीयू मधील पश्चात काळजी डॉ. राहुल पंडित (चेअरमन, क्रिटिकल केअर) यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. डॉ अन्वय मुळे यांनी आतापर्यंत १६० हून अधिक ह्रदयप्रत्यारोपण शस्रक्रिया तसेच १५ हजाराहून अधिक बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.

रोहन यांची प्रकृती आता स्थिर असून नव्या आयुष्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.  रुग्णालयाच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त ही अत्यंत दुघर शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचे डॉ अन्वय मुळे म्हणाले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या कार्यसंघाच्या एकजुटीचे  व रुग्णसेवेप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक असल्याचेही डॉ मुळे यांनी सांगितले.

Story img Loader