मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर २०२२ पासून यांची सुरुवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नोबल पारितोषिक विजेते रिच रॉबर्ट्स उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार, १ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यपीठाचा प्रारंभ ऑगस्ट २०२२ मध्ये करण्यात आला आहे. हे विद्यापीठ रोजगारक्षम बनवणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगाशी संलग्न आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Courses of mah state skill university start from 1st november zws