अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सूरज पांचोलीच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने २४ जूनपर्यंत लांबणीवर टाकली. न्यायालयाने जामीन अर्जावर पोलिसांना त्यांची बाजू मांडण्याचा आदेश दिलाय. न्यायालयाने गुरुवारी सूरजला २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 
जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सूरजला अटक केली. त्याला सुरुवातीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सूरजच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. मात्र, ती फेटाळण्यात आली. त्यानंतरच सूरजच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी सकाळी सुनावणी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा