बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे. एनसीबीने आर्यनला न्यायालयात हजर केले. तसेच या प्रकरणात हाती लागलेले पुरावे सादर करत त्याच्या कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी दिलीय. या प्रकरणी ४ ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायालयाने आर्यन खानसह इतर दोघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. आता ही कोठडी वाढणार की यांची सुटका होणार याचा निर्णय ४ ऑक्टोबरच्या सुनावणीतच ठरणार आहे. एनसीबीकडून या एक दिवसात अधिक कसून चौकशी करुन आर्यन खानसह इतर आरोपींची कोठडी वाढवण्यासाठी प्रयत्न असेल. त्यामुळे न्यायालय नव्याने समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mumbai Rave Party: “अजून लहान आहे, त्याला श्वास तर घेऊ द्या”; एनसीबीच्या कारवाईनंतर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया

नेमकं प्रकरण काय?

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.

आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. यावेळी एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

आर्यन खानचा व्हिडीओ व्हायरल, शाहरुख किंवा पोलिसांकडून अद्याप No Comments

पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने अटक केली आहे. तर इतर पाच जणांची अद्याप चौकशी सुरु आहे. ही क्रूझ मुंबईहून गोव्याकडे जात होती. माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी भरली होती.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.

Mumbai Rave Party : “ कोण सुपरस्टारचा मुलगा, कोण नाही याचं आम्हाला देणंघेणं नाही ” ; NCB ची भूमिका स्पष्ट !

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court give police custody to aryan khan in drugs case mumbai pbs