मुंबई : मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाची शिफारस करणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावर आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचे बुधवारी अखेर एकमत झाले. त्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणी आयोगाला प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना दिली. तसेच, आयोगाला नोटीस बजावून याचिकाकर्त्यांच्या आरोपांवर १० जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन आयोगावरून निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा टाकला.

विशेष म्हणजे, ‘हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी’ या ओळी आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी न्यायालयात म्हणून दाखवल्या. तसेच, आयोगाला प्रतिवादी करण्याच्या मुद्द्यावर याचिकाकर्त्यांमध्ये एकमत घडवून आणण्याचे श्रेय आम्हाला देणाऱ्यांनी या ओळीतील गमक समजून घेण्याचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या विशेष खंडपीठासह न्यायालयात उपस्थित प्रतिवाद्यांच्या वकिलांना मिश्किलपणे सांगितले. याचिकाकर्त्यांच्या भूमिकेनंतर न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षणाची शिफारस करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्याचे आदेश दिले.

pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Manoj Jarange patil
“ओबीसी नेते नालायक असूनही…”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; मराठा तरुणांना आवाहन करत म्हणाले…
Manoj Jarange
मनोज जरांगेंचं आवाहन, “मी एकटा पडलो आहे आणि मराठा जात संकटात, तेव्हा…”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
wardha, Sharad Pawar, amar kale,
शरद पवारांची ‘ती’ ऑफर ‘या’ खासदाराने नाकारली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

हेही वाचा >>>“तळोजा कारागृहातून अन्यत्र हलवू नका”, अबू सालेमची उच्च न्यायालयात धाव; जीवाला धोका असल्याचा दावा

आयोगाने प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट केल्यानंतर याचिकाकर्त्यांनी त्यावर आपले म्हणणे मांडावे. त्यानंतर, सुनावणीची पुढील तारीख निश्चित केली जाईल आणि सुनावणी नियमित घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पूर्णपीठाने स्पष्ट केले.

राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावर मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचे बुधवारी अखेर एकमत झाले. त्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणी आयोगाला प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना दिली.

प्रकरण ऑगस्टपर्यंत निकाली काढणार?

विविध शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने हे प्रकरण लवकरात लवकर निकाली निघण्याची आवश्यकता याचिकाकर्त्यांनी बुधवारच्या सुनावणीतही बोलून दाखवली. त्यानुसार, सगळ्या पक्षकारांचा युक्तिवाद ऐकूण ऑगस्टपर्यंत सपूर्ण प्रकरण निकाली काढले जावे, अशी विनंतीही याचिकाकर्त्यांनी केली. न्यायालयानेही हे प्रकरण पुढील एक-दीड महिन्यात पूर्ण करण्याचे संकेत दिले.

नव्याने युक्तिवाद ऐकला जाणार

गेल्या एप्रिल महिन्यापासून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. बहुतांश याचिकाकर्त्यांचा युक्तिवादही पूर्ण झाला आहे. त्यामुळे, सरकार आणि आरक्षणसमर्थक याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाला लवकरच सुरूवात होणार होती. परंतु, मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यात आल्याने याचिकांवर नव्याने सुनावणी होणार आहे.