मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निर्णय

मुंबई : हेल्मेट न घालून निष्काळीपणा केल्याच्या कारणास्तव अंधेरीस्थित अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयांना मंजूर केलेल्या एकूण नुकसानभरपाईतील ३० टक्के रक्कम मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने कमी केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराची पत्नी, मुलगा आणि आईला एकूण १.४६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार होती. त्याऐवजी त्यांना आता १.०२ कोटी नुकसानभरपाई मिळणार आहे.

पवई येथून २०१४ मध्ये जात असताना एका ट्रकने सत्यप्रकाश सिंह यांच्या दुचाकीस्वाराला धडक दिली होती आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. निष्काळजीपणामुळे ट्रक चालवल्याने अपघात झाला हे न्यायाधिकरणाने नुकसानभरपाईचा दावा मंजूर करताना मान्य केले. मात्र, दुचाकीस्वारानेही वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नसल्याचे न्यायाधिकरणाने नमूद केले. घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेले पुरावे लक्षात घेता त्यात हेल्मेट नसल्याचे दिसून आले. शिवाय, पंच साक्षीदारालाही दुचाकीस्वाराने हेल्मेट घातल्याचे आढळून आले नाही. यावरून दुचाकीस्वारानेही वाहतूक नियमांचे पालन केले नसल्याचे आणि हेल्मेट न वापरता जोखीम पत्करल्याचे स्पष्ट होते. परिणामी, सिंह हेही अपघातातील दुखापतीसाठी जबाबदार होते, असे न्यायाधिकरणाने नमूद केले. तसेच, याच कारणास्तव सिंह यांच्या कुटुंबीयांना मंजूर केलेल्या एकूण नुकसानभरपाईतील ३० टक्के रक्कम कमी करण्यात आल्याचे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

हेही वाचा >>> प्रवाशाला सहा रुपये परत न करणे भोवले; २६ वर्षांपासून बडतर्फ असलेल्या रेल्वेतील तिकीट कारकुनाला कोणताही दिलासा नाहीच

न्यायाधिकरणाने सिंह कुटुंबीयांना व्याजाशिवाय ९५.२३ लाख रुपये एवढी रक्कम नुकसानभरपाई म्हणून मंजूर केली होती. सिंह यांच्या अपघाती मृत्युमुळे झालेले भविष्यातील उत्पन्नाचे नुकसान, पती गमावल्याने पत्नीचे, पित्याचे छत्र गमावल्याने मुलाचे आणि मुलगा गमावल्याने आईचे झालेले वैयक्तिक नुकसान या बाबी न्यायाधिकरणाने नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करताना प्रामुख्याने विचारात घेतल्या. याशिवाय, संपत्तीच्या नुकसानासह अंत्यसंस्काराचा खर्च देखील न्यायाधिकरणाने नुकसानभरपाईच्या रकमेत समाविष्ट केला. आरोपीमुळे अपघात झाला असला तरी दुचाकीस्वाराचा हेल्मेट न वापरण्याचा निष्काळजीपणाही त्याच्या मृत्यूस कारणीभूत होता. त्यामुळे, नुकसानभरपाईतील ३० टक्के रक्कम कपात केल्याचे न्यायाधिकरणाने नमूद केले.

हेही वाचा >>> सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघात भाजपची ‘वॉर रुम’ सुरू होणार

न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार, सिंग यांची पत्नी कोमल हिला (३८) ७० टक्के नुकसानभरपाई मिळणार आहे, तर उर्वरित रक्कम त्यांची आई सुरजादेवी (७३) आणि मुले कुसुम सिंग (१८) आणि इशान (१४) यांच्यात समान प्रमाणात विभागली जाणार आहे. २१ जानेवारी २०१५ रोजी, सिंह यांच्या कुटुंबाने ट्रक मालक एसआर मेटल वर्क्स आणि विमा कंपनी द न्यू इंडिया ॲश्युरन्स विरुद्ध न्यायाधिकरणात धाव घेतली होती. सिंह हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता आणि त्याला प्रतिमहिना ५० हजार रुपये वेतने होते, असा दावा करून सिंह यांच्या कुटुंबीयांनी एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. दुसरीकडे, सिंह यांनी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे तेही अपघाताला जबाबदार होते. शिवाय, ट्रक चालकाकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नसल्यामुळे वाहन मालकाने विमा योजनेच्या अटींचा भंग केल्याचा दावा विमा कंपनीने केला होता. तसेच, सिंह यांच्या कुटुंबीयांनी केलेला नुकसानभरपाईचा दावा फेटाळण्याची मागणी केली होती.