मुंबई : गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आणि अभिनेते रवी किशन हे आपले जन्मदाता असल्याचा दावा करून त्यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी करणाऱ्या २५ वर्षांच्या तरुणीने केलेला अर्ज दिंडोशी येथील दंडाधिकारी यांनी शुक्रवारी फेटाळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपर्णा सोनी आणि रवी किशन यांच्यातील प्रेमसंबंधांतून आपला जन्म झाल्याचा दावा या शिनोव्हा शुक्ला या तरुणीने केला होता. तसेच, कनिष्ठ न्यायालयात धाव घेऊन किशन यांच्या डीएनए चाचणीच्या मागणीसाठी अर्ज केला होता. मात्र, सोनी आणि किशन यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सूचित करणारे कोणतेही सकृतदर्शनी पुरावे आढळून आलेले नाही, असे नमूद करून कनिष्ठ न्यायालयाने या तरुणीचा अर्ज फेटाळला.

हेही वाचा – अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : कुख्यात अनमोल बिष्णोईविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी

हेही वाचा – हाताने मैला साफ करण्याची कृप्रथा : बंदी घालणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, उच्च न्यायालयाचे आदेश

दरम्यान, आपण किशन यांना चाचू म्हणून संबोधत असले तरी प्रत्यक्षात ते आपले जन्मदाता आहेत, असा युक्तिवाद शिनोव्हा हिच्या वतीने करण्यात आला. दुसरीकडे, किशन आणि सोनी यांच्यात कोणतेही संबंध नव्हते. दोघेही चित्रपटसृष्टीत काम करत असल्याने चांगले मित्र होते. मात्र, दोघे कधीच नातेसंबंधांत नव्हते, असा प्रतिदावा किशनच्या वतीने करण्यात आला. तसेच, शिनोव्हा हिचा डीएनए चाचणीची मागणी करणारा अर्ज फेटाळण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court rejected demand for ravi kishan dna test mumbai print news ssb
Show comments