स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही वेबमालिकेचे प्रदर्शन थांबवण्याची कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याच्या कुटुंबीयांनी केलेली मागणी मुंबईतील शहर दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. मुद्रांक घोटाळा आणि त्याचा सूत्रधार असलेल्या तेलगी याच्या जीवनावर आधारित वेबमालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध तेलगी याची मुलगी सना इरफान हिने दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच २५ डिसेंबर रोजी ओटीटीवरील या वेबमालिकेचे प्रदर्शन थांबविण्याची अंतरिम मागणी केली होती. सना आणि वेबमालिकेचे निर्माते यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने गुरूवारी सना हिच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी न्यायालयाने सनाची अंतरिम मागणी फेटाळली.

हेही वाचा– मुंबई : मोडक सागर धरणाची दुरुस्ती ; धरण सुरक्षा संघटनेचा मुंबई महानगरपालिकेला अहवाल सादर 

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
fake power of attorney marathi news
सोलापूर : नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…

सना हिने तेलगी कुटुंबीयांच्यावतीने हा दावा दाखल केला होता. या वेबमालिकेसाठी आमच्या कुटुंबीयांची परवानगी घेण्यात आली नाही, असा आरोप सना हिने केला होता. या वेबमालिकेचे निर्माते ॲप्लॉज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हंसल मेहता, सरव्यवस्थापक प्रसून गर्ग आणि सोनी लाईव्ह यांच्याविरुद्ध हा दावा केला होता.

हेही वाचा- नाताळच्या दिवशी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

ही वेबमालिका एका पुस्तकावर आधारित आहे. मात्र या पुस्तकातील तथ्यांमध्ये विसंगती आहे. या पुस्तकातील आपल्या वडिलांच्या व्यक्तिरेखेचे चित्रण खोटे, निराधार, अपमानास्पद, आक्षेपार्ह, अप्रिय, अत्यंत बदनामीकारक आहे. आमची, आमच्या कुटुंबाची आणि आमच्या मृत वडिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने या वेबमालिकेची निर्मिती केली गेली आहे. त्याचप्रमाणे या वेब मालिकेमुळे आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. ही वेब मालिका प्रदर्शित झाल्यास आमचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असा दावा सना हिने केला होता.

Story img Loader