मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत सेलिब्रिटी आहे आणि अनेक चित्रपटांत ती भूमिका साकारत असल्याने त्याच्या चित्रीकरणात ती व्यग्र आहे. असे असले तरी आपल्यासमोरील प्रकरणात ती आरोपी आहे हे विसरू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवून सुनावणीला कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची कंगनाची मागणी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांनी फेटाळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली आहे. मात्र आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहोत. त्यामुळे चित्रीकरणासाठी आपल्याला देश-विदेशात सतत प्रवास करावा लागतो, असे सांगून प्रकरणाच्या सुनावणीसाठी कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची परवानगी देण्याची विनंती कंगनाने अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली होती. मात्र महानगर दंडाधिकारी आर. आर. खान यांनी तिची ही मागणी फेटाळली. त्याचा तपशीलवार आदेश गुरुवारी उपलब्ध झाला. त्यात खटला जलदगतीने निकाली निघण्यासाठी कंगनाचे सहकार्य आवश्यक आहे. परंतु या प्रकरणी आपली उपस्थिती आवश्यक नाही आणि तिचे वकील तिच्या वतीने सगळी औपचारिकता पार पाडतील, असे कंगनाने मनात ठरवले आहे. मात्र तिला सुनावणीसाठी कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची परवानगी दिली, तर ज्येष्ठ नागरिक असलेल्या अख्तर यांचे तक्रारदार म्हणून असलेले अधिकार प्रभावित होतील व खटल्याचे कामही रखडेल, असे न्यायालयाने म्हटले. 

सूट का नाही? कंगनाने यापूर्वी हे प्रकरण अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी अपयशी प्रयत्न केले आहेत. कंगना तिच्या आवडीनुसार या खटल्याच्या तिच्या अटी ठरवत आहे. परंतु तिला कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची सूट दिली जाऊ शकत नाही. तिला कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.