मुंबई : मालाड पश्चिम परिसरातील मढ – मार्वेकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारा प्रार्थनास्थाचा बंगला तोडण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पालिकेच्या पी उत्तर विभागाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला असून मढ मार्वेकडे जाणाऱ्या पर्यटकांना काही काळ त्रास सोसावा लागणार आहे.

मालाड पश्चिमेकडील मार्वे रस्त्यावर असलेले प्रार्थनास्थळ आणि आजूबाजूची बांधकामे यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. मढ मार्वेकडे जाणाऱ्या या रस्त्यावर नेहमी पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प पालिका प्रशासनाने हाती घेतला होता. या रुंदीकरणाआड सदर प्रार्थनास्थळाचा एक बंगला आणि नऊ दुकाने येत होती. बंगला आणि नऊ दुकानांना पालिकेच्या पी उत्तर विभागाने नोटीस पाठवली होती. तसेच ही बांधकामे तोडण्याच्या बदल्यात संबंधितांना मोबदला देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने दिला होता. दुकानदारांनी पालिकेचा प्रस्ताव मान्य केला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने दुकाने हटवण्याची कारवाई केली होती. मात्र बंगल्याच्या प्रकरणात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे बंगल्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र न्यायालयाने आता या बंगल्याच्या पाडकामास स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे काम रखडले आहे.

Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Thane Passengers loot rickshaw, Thane rickshaw meter, Thane, rickshaw meter,
ठाणे : रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट
The Supreme Court directed the Ajit Pawar group from the clock symbols
‘घड्याळ’ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पुन्हा बजावले
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!
Supreme Court On Uttar Pradesh Government
Supreme Court : “ही मनमानी…”, बुलडोझर कारवाईवरून योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; २५ लाखांच्या भरपाईचे आदेश
The Supreme Court ruling on taking over private property
खासगी मालमत्ता ताब्यात घेण्यावर अंकुश; सर्व भौतिक संसधाने समुदायांच्या मालकीची नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

हेही वाचा – मुंबई : नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार, पालिका प्रशासनाचा इशारा

बंगल्यामुळे मढकडे जाणाऱ्या रस्ता अरुंद झाला असून केवळ एकच मार्गिका या ठिकाणी उपलब्ध आहे. बंगला हटवणे आवश्यक असल्यामुळे पी उत्तर विभागाने त्याला नोटीस पाठवली होती. सुरुवातीला हा बंगला पुरातन वास्तू असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पालिका प्रशासनाने पुरातन वास्तू विभागाकडे याबाबत विचारणा केली असता हे पुरातन वास्तू नसल्याचे पुरातन वास्तू विभागाने स्पष्ट केले होते. मात्र हे प्रकरण न्यायायलात गेल्यामुळे ही कारवाई थांबली होती.

हेही वाचा – नऊ कोटींच्या कोकेनसह मुंबई विमानतळावरून परदेशी महिलेला अटक, डीआरआयची कारवाई

बंगल्याच्या पाडकामासाठी पालिका प्रशासनाने नियमानुसार नुकसान भरपाईचे पत्रही दिले होते. बंगल्याची एकूण जागा ३०० चौरस मीटर असून पालिका प्रशासनाच्या नियमानुसार केवळ १२० चौरस मीटर जागेचाच मोबदला दिला जात असल्यामुळे नुकसान भरपाईच्या मुद्द्याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे.