मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील सर्व उघडी भुयारी गटारद्वारे संरक्षक जाळय़ांनी सुरक्षित करण्याचे आदेश देऊन पाच वर्षे लोटूनही केवळ दहा टक्के भुयारी गटारद्वारे झाकणबंद झाल्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली. महापालिकेच्या सुस्त कारभाराबाबत ताशेरे ओढत सोमवारपर्यंत यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ मुंबई महापालिका आयुक्तांनी सोमवाररनंतर उघडय़ा भुयारी गटारद्वाराबाबत एकही तक्रार येता कामा नये, अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळय़ादरम्यान उघडय़ा भुयारी गटारद्वारात पडून जीवितहानी होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. याच संदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान बुधवारी महापालिकेच्यावतीने वरिष्ठ वकील अनिल साखरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. मुंबई व उपनगरात एकूण ७४ हजार ६८२ भुयारी गटारद्वारे असल्याचे आणि त्यापैकी पूरप्रवण भागातील एक हजार ९०२ भुयारी गटारद्वारे संरक्षक जाळय़ांनी सुरक्षित करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. तथापि, सर्वच भुयारी गटारद्वारावर संरक्षक जाळय़ा का बसवण्यात आल्या नाहीत,  असा प्रश्न न्यायालयाने केला. सगळीच भुयारी गटारद्वारे संरक्षक जाळय़ांनी सुरक्षित करण्याची आवश्यकता असल्याचेही सुनावले. महापालिकेची कृती ही २०१८ सालच्या न्यायालयाच्या निकालाशी विसंगत असल्याचेही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती संदीप (पान १२ वर) (पान ३ वरून) मारणे यांच्या खंडपीठाने म्हटले. न्यायालयाच्या नाराजीनंतर संबंधित विभागाशी याबाबत चर्चा करण्यासाठी आणि ती करून माहिती देण्यासाठी महापालिकेने न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयानेही पालिकेची विनंती मान्य करून प्रकरणाची सुनावणी १९ जून रोजी ठेवली.

 न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवाररपूर्वी आपापल्या विभाग-खात्याच्या कार्यक्षेत्रातील मॅनहोलचे सर्वेक्षण करून ते उघडे राहणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या. तसेच यासंदर्भात तक्रारी आल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला.

महापालिकेच्या प्रतिज्ञापत्रात काय ?

महापालिका हद्दीत ७४ हजार ६८२ (मलनिस्सारण वाहिन्या) असून त्यापैकी १९०८ ठिकाणीच मॅनहोल संरक्षक जाळय़ांनी सुरक्षित करण्यात आहेत. तर २५ हजार ६४० (पर्जन्य जलवाहिन्या) पैकी ४३७२ मॅनहोलवर संरक्षक जाळय़ा बसविण्यात आल्या आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरात १४ ठिकणी मॅनहोलवर आधुनिक (सेंन्सर बेस मॅनहोल ट्रॅकिंक सिस्टीम) जाळय़ा बसवण्यात आल्या आहेत. मॅनहोलचे झाकण उघडले गेल्यास त्यातील आधुनिक यंत्रणेद्वारे महापालिकेच्या संबंधित विभागाला त्याची माहिती मिळेल. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येत असून त्यासाठी ११ लाख ५० हजार रुपये खर्च केल्याचेही महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

धोका काय?

मुंबईत विविध विभागांच्या वाहिन्यांना जोडणारी जवळपास एक लाख भुयारी गटारद्वारे आहेत.  पर्जन्यजलवाहिन्या खाते, मलनिस्सारण प्रचालन खाते, जल अभियंता खाते, सांडपाणी यांसारख्या विविध खात्यांच्या भुयारी गटारद्वारांचे जाळे मुंबईत पसरलेले आहे. भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे खोलवर असतात. त्यामुळे अशा भुयारी गटारद्वारांवर झाकण नसल्यास त्यातून जीवघेणा अपघात होऊ शकतो. पावसाळय़ादरम्यान एका उघडय़ा भुयारी गटारद्वारात पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचे निधन झाल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला होता. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cover the sewers by monday orders of the municipal commissioner orders of the high court mumbai print news ysh