मुंबई : करोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) देशभरात १० ठिकाणी बुधवारी शोधमोहीम राबवली. मुंबईसह हरियाणा, उत्तर प्रदेश व राजस्थान येथील ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे एक कोटी ८० लाख रोख रक्कम तसेच अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

करोनाकाळात महापालिकेकडून करण्यात आलेल्या चार हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या पडताळणीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे कंत्राटदारांच्या ठिकाणांवर ईडीने धडक दिली. वैद्यकीय सुविधा पुरवणाऱ्या व प्राणवायू प्रकल्पांची स्थापना करणाऱ्या कंत्राटदारांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. घाटकोपर येथील कंत्राटदार रोमिल छेडा यांच्या ठिकाणांवर ईडीने शोधमोहीम राबविली. करोनाकाळात प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे कंत्राट त्यांना देण्यात आले त्हा प्रकल्प उभारण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च झाला. यात मानक गुणवत्तेशी तडजोड करून निकृष्ट दर्जाची उपकरणे पुरवण्यात आल्याचा संशय असून त्यानंतरही कंत्राटातील सर्व फाईलना मंजुरी देत मोबदलाही देण्यात आला. त्यामुळे या कंत्राटाशी संबंधित अधिकारीही संशयाच्या फेऱ्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

छेडा यांनी उत्तर प्रदेशातील एका संस्थेमार्फत हे काम करून घेतल्याचा संशय आहे.  ते प्रयागराज येथील मे. हायवे कन्स्ट्रक्शन या कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी होते. याच कंपनीला मिळालेल्या पेग्विनशी संबंधित कंत्राटावरून वाद झाला होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण यांच्या चौकशीतून छेडाबाबत ईडीला माहिती मिळाली होती. छेडा यांच्या ठिकाणांवरून एक कोटी २० लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त ‘ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रा. लि.’ चे राहुल गोम्स दहिसर, वरळी, एमएमआरडीए, मुलुंड व बीकेसी भाग दोन येथील कोविड रुग्णालयांमध्ये खाटा, पंखे, तंबू आणि इतर सुविधांचे कंत्राटही ईडीच्या फेऱ्यात आहे. कंपनीला महापालिकेने ४० कोटी रुपये दिले होते. ‘रोमेल ग्रुप’चे जुड रोमेल व डॉनिक रोमेल यांच्याशी संबंधित विलेपार्ले येथील ठिकाणावरही शोधमोहिम राबवण्यात आली.

करोना जम्बो केंद्र युनेस्को गोरेगावसह मेक शिफ्ट रुग्णालये उभारण्यासाठी त्यांच्या कंपनीला १३ कोटी मिळाले होते. त्यांच्या घरातून  ६० लाख रुपये जप्त केले. रोमेल बंधूंचे व सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यातील संबंधांबाबत ईडी तपास करीत आहे. भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी तपास करीत आहे. तक्रारीनुसार ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी लाईफ लाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा, राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader