मुंबई: महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व करोना लसीकरण केंद्रांवर करोना लसीकरण बंद राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे १ मे रोजी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व करोना केंद्रांवर करोना लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. २ मेपासून करोना लसीकरण पूर्ववत सुरू राहील. त्यामुळे नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा- एप्रिलमध्ये मुंबईत साडेदहा हजार घरांची विक्री

मुंबई महानगरपालिकेची २४ लसीकरण केंद्रे आहेत. या लसीकरण केंद्रांवर करोना लसीची पहिली, दुसरी तसेच वर्धक मात्रा उपलब्ध आहे. दोन दिवसांपूर्वीच इन्कोव्हॅक ही नाकावाटे देण्यात येणारी लस ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवसांमध्ये ६७ नागरिकांनी ही लस घेतली आहे.