मुंबई : गणेशोत्सवात गणेश दर्शनानिमित्त उसळणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. गर्दीमध्ये एखाद्या भाविकाला अचानक हृदयविकाराचा त्रास होऊन तो बेशुद्ध पडल्यास कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन म्हणजेच हृदयाचे पुनरुज्जीवन (सीपीआर) केल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईतील नामांकित गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना एका खासगी रुग्णालयाकडून सीपीआरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नागरिकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. रस्त्याने चालता चालता नागरिकाला हृदयविकाराचा झटका येतो. गर्दीच्या ठिकाणी याची शक्यता अधिक असते. अशा वेळी संबंधित व्यक्तीचे हृदय धडधडणे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. अशा व्यक्ती सीपीआर दिल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या हृदयाची धडधड अचानक थांबते, त्यावेळी त्याला वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत त्याच्या शरीरात विशेषत: मेंदू आणि हृदयामध्ये रक्त आणि प्राणवायूचा कृत्रिमरित्या पुरवठा करण्यासाठी छाती दाबणे आणि तोंडाद्वारे श्वासोच्छवास दिला जातो. श्वासामुळे फुफ्फुस आणि रक्तप्रवाहाला प्राणवायूचा पुरवठा होतो. मेंदू आणि हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांना डिफिब्रिलेशन, औषधे आणि व्हेंटिलेशन यासारखी वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत ते कार्यरत ठेवण्यासाठी सीपीआरची मोठी मदत होते. त्यामुळे मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयाने गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांसाठी सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

commissioner review facilities in girls ashram school
आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Imtiaz Jalil will contest assembly elections from Aurangabad East
इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व मधून निवडणुकीच्या रिंगणात
pune city reasons to avoid firecrackers noise pollution during Diwali pune
कर्णसुखद की नेत्रसुखद!
Sale of panati by female prostitutes thane news
देहविक्री व्यवसायातून बाहेर पडत साकारले “स्वयंरोजगाराचे प्रकाशपर्व”; देहविक्री करणाऱ्या महिलांकडून पणत्यांची विक्री
Vadgaon Sherit Mahayuti was not the candidate for the assembly elections Sharad Pawar group Pune print news
‘इतिहास’ बदलणाऱ्या ‘ या ‘ मतदारसंघाचा ‘वर्तमान’ अस्वस्थ! वडगाव शेरीत महायुतीचा उमेदवार ठरेना; शरद पवार गटाकडून ‘थांबा आणि पाहा’ धोरण
Enrol in a training institute and get a free tablet lure to students from institutes
“प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्या अन् मोफत ‘टॅबलेट’ मिळवा”, संस्थांकडून विद्यार्थ्यांना आमिष
achalpur assembly constituency
अचलपूरच्‍या भाजप उमेदवाराविरोधात पक्षाअंतर्गत सामूहिक बंड; ‘डमी’ उमेदवार दिल्‍याचा आरोप

हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून दोन वर्षांत ३२१ कोटींची आर्थिक मदत!

गणेशोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सीपीआर तंत्राची मूलभूत तत्वे, छातीचा दाब, श्वासोच्छवास आणि स्वयंचलित डिफिब्रिलेटरचा वापर कसा करायचा याची माहिती देण्यात येणार आहे. यावेळी स्वयंसेवकांना प्रात्यक्षिके आणि परिस्थिती आधारित क्रिया दाखवण्यात येणार आहेत.

हेही वाचा – गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

या मंडळातील स्वयंसेवकांना देणार प्रशिक्षण

लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली, तेजुकाया सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळ, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोर्टचा इच्छापूर्ती, रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ गणेशोत्सव मंडळ, चिंच बंदर – डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळातील स्वयंसेवकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.