मुंबई : लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने, तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. तसेच वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणीच्या सामान्य लोकल डब्यात गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी सुरू आहे. या विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणींचे सत्र सुरू आहे. त्यातच मध्य रेल्वेच्या महिला तिकीट तपासनीस रुबिना अकिब इनामदार यांनी एका दिवसात १५० विनातिकीट प्रवाशांना पकडून ४५,७०५ रुपये दंड वसूल करून एका दिवसात विक्रमी कामगिरी केली. याबाबत त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विनातिकीट प्रवाशांचा प्रवास रोखण्यासाठी, तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. विशेषत वातानुकूलित लोकलमध्ये आणि स्थानकावर तिकीट तपासणी मोहिमा राबवून चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत ८१,७०९ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २.७० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तेजस्विनी पथकातर्फे सखोल तिकीट तपासणी करण्यात येते.

तेजस्विनी पथक २ च्या प्रवासी तिकीट निरीक्षक (टीटीआय) रुबिना अकिब इनामदार यांनी सोमवारी १५० विनातिकीट प्रवाशांची प्रकरणे नोंदवली. त्यांच्याकडून तब्बल ४५,७०५ रुपये दंड वसूल करण्यात आला. यात लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यामधून विनातिकीट प्रवास करणारी ४७ प्रकरणे नोंदवण्यात आली. याप्रकरणी १६,४३० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर, द्वितीय श्रेणी डब्याचे तिकीट घेऊन प्रथम श्रेणी डब्यामधून प्रवास करणाऱ्या ६३ प्रकरणांची नोंद करण्यात आली. याप्रकरणी १९,१५० रुपये दंड वसूल करण्यात आला. अनारक्षित सामानाची ३ प्रकरणे नोंदवून ३५० रुपये, तर इतर ३७ प्रकरणे नोंदवून ९,७७५ रुपये दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा >>> क्षमता २० कोटी, दाखविले १३३ कोटी! ‘न्यू इंडिया’प्रकरणी ऑडिट कंपन्यांना समन्स

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एका दिवसात सर्वाधिक दंडवसुली करण्यामध्ये प्रवासी तिकीट निरीक्षक रुबिना अकिब इनामदार पहिल्या ठरल्या.

१२९ दिवसांत ३५ हजारांचा दंड

याआधी प्रवासी तिकीट निरीक्षक (टीटीआय) सुधा द्विवेदी यांनी एकाच दिवसात १२९ विनातिकीट प्रवाशांना पकडून ३५,५५० रुपये दंड वसूल करून विक्रम नोंदविला होता. परंतु, रुबिना यांनी हा विक्रम मोडीत काढला. रुबिना राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू असून २०१३ मध्ये क्रीडा कोट्यातून नियुक्त झाल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अनेक प्रवासी या लोकलमधून विनातिकीट प्रवास करतात. तर, काही प्रवासी सामान्य लोकलच्या प्रथम अथवा द्वितीय श्रेणीचे तिकीट घेऊन प्रवास करतात. अशा प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो.