मुंबई : मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात आला असून शनिवारी रात्री १२.३० पासून ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा उपलब्ध नसेल. तसेच इतर लोकल, रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन वर्षांपासून कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आता या पुलाच्या तुळया उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याणपर्यंत चालवण्यात येतील. तसेच या स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने धावतील. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. तसेच या स्थानकातून पनवेल दिशेकडे लोकल धावतील.

हेही वाचा >>> घाटकोपर येथील महाकाय फलक कोसळणे ही नियती; जामिनाची मागणी करताना आरोपी भावेश भिंडेचा अजब दावा

मुख्य मार्गावर

– ब्लॉकपूर्वी रात्री १२.१४ वाजता सीएसएमटी ते कसारा शेवटची लोकल असेल.

– ब्लॉकपूर्वी रात्री १०.३४ वाजता कल्याण ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.

– ब्लॉकनंतर पहाटे ४.४७ वाजता सीएसएमटी ते कर्जत पहिली लोकल असेल.

– ब्लॉकनंतर पहाटे ४ वाजता ठाणे ते सीएसएमटी पहिली लोकल असेल.

हार्बर मार्गावर

– ब्लॉकपूर्वी रात्री १२.१३ वाजता सीएसएमटी ते पनवेल शेवटची लोकल असेल.

– ब्लॉकपूर्वी रात्री १०.४६ वाजता पनवेल ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.

– ब्लॉकनंतर पहाटे ४.५२ वाजता सीएसएमटी ते पनवेल पहिली लोकल असेल.

– ब्लाकनंतर पहाटे ४.१७ वाजता वांद्रे ते सीएसएमटी पहिली लोकल असेल.

या रेल्वेगाड्या दादरपर्यंत धावणार…

हावडा ते सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस, अमृतसर ते सीएसएमटी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, भुवनेश्वर ते सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, हावडा – सीएसएमटी मेल

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cr special megablock on saturday cstm to byculla wadala road local services remain closed mumbai print news zws
Show comments