मुंबई : क्रेडाय-एमसीएचआयतर्फे १७ ते १९ जानेवारी या कालावथीत वांद्रे -कुर्ला संकुल येथील जीओ वर्ल्ड सेंटरमध्ये ३२ वे मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात आले असून या मालमत्ता प्रदर्शनाचे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते शुक्रवार, १७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामुळे ग्राहकांना एकाच छताखाली घरखरेदीचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्राहकांना एकाच ठिकाणी घरखरेदीचे विविध पर्याय उपलब्ध व्हावे, त्यांना तिथल्या तिथे सुलभरित्या गृहकर्ज उपलब्ध व्हावे यासाठी क्रेडाय – एमसीएचआयकडून मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदा १७ ते १९ जानेवारी या कालावधीत बीकेसीमध्ये ३२ वे मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात मुंबई, ठाणे,नवी मुंबई, रायगडसह अन्य ठिकाणच्या मालमत्तांचे, घरांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनात ४० हून अधिक विकासक आपल्या मालमत्तांसह सहभागी होणार आहेत.

हेही वाचा…कामावर देखरेख ठेवणाऱ्या ॲपला अभियंत्यांचा विरोध, प्रशासन अभियंत्यांमधील वाद चिघळण्याची शक्यता

महिलांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांना घर खरेदीस प्रोत्साहित करण्यासाठी या प्रदर्शनात विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. त्यामुळे या मालमत्ता प्रदर्शनात अधिकाधिक इच्छुक ग्राहकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन क्रेडाय – एमसीएचआयकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Credai mchi organized 32nd property fair at jio world center in bkc from 17th to 19th january mumbai print news sud 02