झेंडे विक्रेत्यांची लगबग.. टीशर्ट-टोप्या विकणारे व टॅटू काढणाऱ्यांभोवती चाहत्यांची गर्दी.. भोंग्यांच्या आवाजाने वानखेडेचा दणाणलेला परिसर.. सकाळपासूनच झालेली गर्दी आवरताना पोलिसांची उडालेली तारांबळ.. तर, सामन्याच्या तिकिटांचा चोरटा काळाबाजार.. हे दृश्य वानखेडे स्टेडियम परिसरात गुरुवारी सकाळी १२ वाजल्यापासून पाहण्यास मिळत होते. निमित्त होते सायंकाळी होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीज ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषक सामन्याचे. भारतीय व परदेशी चाहत्यांच्या उपस्थितीने वानखेडेचा परिसर ‘क्रिकेटमय’ झाल्याचे दृश्य दिसत होते.
भारतविरुद्ध वेस्ट इंडीज हा ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषकानिमित्त उपांत्य फेरीसाठी होणारा सामना गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. सायंकाळी सातच्या या सामन्याला मात्र सकाळी १२ वाजल्यापासूनच क्रिकेट चाहत्यांची गर्दी झाल्याने सामन्यापूर्वीचे वातावरण रंगण्यास सुरुवात झाली होती. वानखेडे स्टेडियमच्या सर्वच प्रवेशद्वारांवर त्यामुळे पोलिसांनी सामान्यांना बंदी घातली होती व तिकीटधारकांना प्रवेश देण्यात येत होता. या वेळी सामन्यासाठी आलेल्या चाहत्यांचा क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर व विशेषत चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर किरकोळ विक्रेत्यांची गर्दी झाली होती. भारताचे विविध आकाराचे झेंडे, भारतीय क्रिकेटपटूंच्या नावांचे टॅटू, भारतीय संघाचे टीशर्ट-टोप्या, भोंगे व झेंडय़ांच्या पट्टय़ा आदींची चढय़ा दराने विक्री करण्यात येत होती. यात आयसीसीतर्फे नेमण्यात आलेल्या विक्रेत्यांकडून विकण्यात येणाऱ्या टीशर्ट व टोप्यांना चाहत्यांकडून अधिक मागणी होत होती. मात्र, भारतीय संघाचे जुन्याच रंगातील टीशर्ट विक्रीला असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, यामुळे प्रवेशद्वारांवर चाहत्यांची गर्दी झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. अखेर पोलिसांना वारंवार घोषणा करून चाहत्यांना दूर लोटावे लागत होते.

तिकिटांचाही काळाबाजार
सामन्यापूर्वी गर्दी केलेल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये अनेकांकडे तिकिटे नसल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले होते. त्यामुळे, अशा क्रिकेट चाहत्यांना हेरून तिकिटांचा काळाबाजार करणारे त्यांच्याकडील तिकिटे विकू पाहत होते. स्टेडियममधील सुनील गावस्कर स्टँड, नॉर्थ स्टँड येथील १ हजार रुपयांची तिकिटे तब्बल १० ते १५ हजार रुपयांपर्यंत विकण्यात येत होती.
नागपूरहून मुंबईला
स्टेडियमबाहेर टॅटू काढून देणाऱ्यांपैकी मदन शिंदे हा थेट नागपूरहून केवळ या सामन्यावेळी टॅटू काढून देण्यासाठी मुंबईला आला होता. मुळात शिंदे हा नागपुरात बर्फावर कलाकुसर करणारा कलाकार आहे. तो नागपूर येथील क्रिकेट सामन्यांच्यावेळी तेथील स्टेडियमबाहेर टॅटू काढण्यासाठी उभा असतो. मात्र मुंबईतील क्रिकेटप्रेमींसमोर आपली कला सादर करण्यासाठी तो प्रथमच मुंबईला आला होता.

Krishnamai festival begins in Sangli from today
सांगलीत आजपासून कृष्णामाई उत्सव
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Lahore Gaddafi stadium is ready for international cricket
लाहोरचे स्टेडियम सज्ज! नूतनीकरण विक्रमी वेळेत केल्याचा ‘पीसीबी’चा दावा
IND vs ENG 1st ODI Ravindra Jadeja create record dismissed Joe Root 12 times in International Cricket
IND vs ENG : रवींद्र जडेजाने केला अनोखा पराक्रम! जो रुटला तब्बल इतक्या वेळा दाखवला तंबूचा रस्ता
IND vs ENG Stampede scenes during 2nd ODI ticket sale in Cuttack few fans fall unconscious
IND vs ENG: भारत-इंग्लंड वनडे तिकिट विक्रीदरम्यान कटकमध्ये चेंगराचेंगरी, काही जण झाले बेशुद्ध; VIDEO व्हायरल
IND vs ENG ODI Series Live Streaming Details How to Watch India vs England 1st ODI Match
IND vs ENG: भारत-इंग्लंड वनडे मालिका दोन विविध स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
IND vs ENG ODI Series Full Schedule Timings and Squads in Detail India England
IND vs ENG: भारत वि इंग्लंड वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक वाचा एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
controversy over dhirendra shastri moksha remark
उलटा चष्मा:मोक्ष मिळवून दिला जाईल!

 

Story img Loader