अतिक्रमणाविरोधात कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी असतानाही के-पश्चिम विभाग कार्यालयातील दुय्यम अभियंत्याने कारवाई करण्यासाठी लाच मागितली. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दीपक शर्मा असे या लाचखोर दुय्यम अभियंत्याचे नाव आहे. हा अभियंता यापूर्वी पी उत्तर विभागात होता. मुंबईतील सर्वांत भ्रष्ट म्हणून पी उत्तर विभाग ओळखला जातो. पी उत्तर विभागात नियुक्ती मिळावी यासाठी अनेक अभियंते इच्छुक असतात.
हेही वाचा >>>उद्धव ठाकरेंची तोफ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार; म्हणाले, “तुम्ही सभा लावा, मी…”
कार्यकारी विभाग केला की अभियंत्याची कमी महत्त्वाच्या विभागात बदली केली जाते. परंतु शर्मा मात्र त्यास अपवाद ठरले आणि भ्रष्टाचारात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या के पश्चिम विभागात नियुक्ती मिळविली. काही दिवसांपूर्वीच या विभागात आलेल्या शर्मा यांच्यावर आता लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.अतिक्रमणावर कारवाई करण्यात यावी असे उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही शर्मा यांनी कारवाई केली नाही. पण तक्रारदाराकडेच कारवाई करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. अखेरीस तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.