लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. यावेळी अनेक नेत्यांकडून एक्स(ट्वीटर) समाज माध्यमावरून एका हॅकरची चित्रफीत अपलोड करण्यात आली आहेत. त्यात आपण ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो, असा दावा एका हॅकरने केला आहे. त्या चित्रफीतीतील ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबईतील दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून दक्षिण सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुन्हा दाखल झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून एक चित्रफीतही वायरल करण्यात येत आहे. ती चित्रफीत एका स्टिंग ऑपरेशनचा भाग आहे. त्यात ईव्हीएम हॅकिंगची माहिती देत असलेल्या व्यक्तीचे नाव सय्यद सुजा आहे. ईव्हीएम विकसित करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत त्याने २००९ ते २०१४ या काळात काम केल्याचे सांगितले जाते. तसेच तो स्वत:ला सायबर तज्ज्ञ असल्याचा दावा केला आहे.
आणखी वाचा-आईला रुग्णालयात भेटून घरी जाताना १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
इलेक्शन कमिशन आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांकडून निवडणूक आयोगासाठी ईव्हीएमची निर्मिती केली जाते. चित्रफीतीमध्ये दोन व्यक्ती एका कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंगबाबत चर्चा करत आहेत. त्यावर हॅकरला १०५ उमेदवारांपैकी ६३ उमेदवारांना जिंकवून देण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी हॅकर सय्यद सुजाने त्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा क्रमांक लागेल, असा दावा केला आहे. तसेच २८८ मतदारसंघापैकी २८१ ठिकाणी आम्हाला ईव्हीएमचा अॅक्सेस आहे, असेही तो म्हणला होता. हॅकिंगसाठी ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी हायस्पीड इंटरनेट कनेक्शन आणि फिल्डवर काही माणसे लागतील, असेही सुजाने सांगितले होते. याप्रकरणी पोलीस सुजासह याप्रकरणाशी संबंधीत इतर व्यक्तींबाबत तपास करत आहेत.
आणखी वाचा-कुलाब्यातील प्रकल्पाला पालिकेची स्थगिती?
लंडन येथे पत्रकार परिषद
२०१८ पासून सय्यद सुजा अमेरिकेत राहतो असा दावा करण्यात आला आहे. पण, सध्या तो कोठे आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. याआधी २१ जानेवारी २०१९ रोजी सुजाने लंडन येथे पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम हॅकिंगबाबत माहिती दिली होती. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे एक माजी नेतेही उपस्थित होते. त्याबाबत निवडणूक आयोगानेही चित्रफीतीमधल व्यक्तीचा ईव्हीएम हॅकिंगबाबत दावा निराधार, धादांत खोटा आहे. ईव्हीएम हॅक करता येत नाहीत. तसेच ती कोणत्याही फ्रिक्वेन्सीशी जोडले जाऊ शकत नाहीत, असा खुलासा याबाबत निवणूक आयोगाकडून करण्यात आला आहे.