मुंबईः कांदिवली पूर्व येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम असताना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी माजी नगरसेविका माधुरी भोईर, योगेश भोईर, नितीन नाईक यांच्यासह १० कार्यकर्त्यांविरोधात समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यातील काहींना नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांच्यावतीने भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कांदिवली पूर्व येथील श्याम नारायण चौकाजवळील आदित्य ठाकरे यांच्या नावाचा फलक कापडाने झाकण्यात आला होता. त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जमाव जमवून घोषणाबाजी केली. याप्रकरणी माधुरी भोईर, योगेश भोईर, नितीन नाईक, चित्तरंजन देवकर, उमेश चेऊलकर, सुरेषा मोरे, दिगंबर राणे, मंगेश साळुंखे, मंगेश मोरे व इतर कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदीचा नियम भंग केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. समता नगर पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी माधुरी भोईर, योगेश भोईर, नितीन नाईक व चित्तरंजन देवकर यांना सीआरपीसी कलम ४१(अ) अंतर्गत नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.