मुंबई : ट्वीटरवर महिला पोलिसांबद्दल अश्लील विधान करणाऱ्या व्यक्तीविरोधात पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतनगर पोलिसांनी रामचंद्र आंब्रडकर ट्वीटर अकाऊंट वापरकर्त्याविरोधात भादंवि कलम ५००, ५०९ व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम ६६ (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने ‘सीपी मुंबई पोलीस’ या ट्वीटर अकाऊंटवर संदेश पाठवला होता. त्यात महिला पोलिसांबद्दल अश्लील विधान केले होते, अशी तक्रार महिला पोलीस हवालदाराने केली आहे. या तक्रारीवरून पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तसेच या संदेशात पोलिसांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी खोडसाळपणे समाज माध्यमांवर पोलिसांबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against those who made obscene statements on twitter about female police officers mumbai print news amy
Show comments