लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भांडुप परिसरातील एका इमारतीच्या आवारात फिरणाऱ्या भटक्या श्वानाच्या डोळ्यात रसायन टाकून एका महिलेने त्याचा डोळा निकामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भांडुप पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
CCI probe finds Zomato, Swiggy violating competition norms
स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा

भांडुप पश्चिम येथील गगनगिरी सोसायटीच्या आवारात ही घटना घडली. या सोसायटीमध्ये राहणारी एक शिक्षिका अनेक दिवसांपासून एका भटक्या श्वानाची देखभाल करते. मात्र महिन्याभरापूर्वी अचानक या श्वानाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने तत्काळ या श्वानाला डॉक्टरांकडे नेले. त्याच्या डोळ्यात रसायन गेल्याने तो पूर्णपणे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी महिलेला सांगितले.

आणखी वाचा-मुंबई : ७० वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी तीन वर्षांनंतर हत्येचा गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी सोसायटीतच राहणारी एक महिला या श्वानाच्या अंगावर लाल रंगाचे द्रव्य फेकत असल्याचे शिक्षिकेच्या मुलीने पाहिले होते. तिने ही बाब आईला सांगितल्यानंतर त्यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रण तपासले. यामध्ये यापूर्वीही याच महिलेने या श्वानाच्या डोळ्यात रसायन टाकल्याचे उघडकीस आले. त्यामुळे शिक्षिकेने याबाबत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.