मुंबई: विविध राज्यांमध्ये मोबाइलची चोरी केल्यानंतर त्यांचे ईएमआय नंबर बदलून याच मोबाइलची पुन्हा विक्री करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेने गोवंडी येथून अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी १६ लाख रुपये किमतीचे एकूण १६२ मोबाइल जप्त केले असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.

गोवंडी-शिवाजी नगर परिसरातील बैंगणवाडी परिसरात काहीजण मोठ्या प्रमाणात चोरीचे मोबाइल विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी खात्री करून घेतल्यानंतर सोमवारी याठिकाणी छापा घातला. यावेळी पोलिसांना एका घरात मोबाइलचा मोठा साठा मिळाला. त्यानुसार पोलिसांनी तेथे असलेल्या तौसीब सिद्धीकी (३२), मेराज शेख (३४) आणि रजा शेख (२४) या तिघांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी हे मोबाइल विविध राज्यांतून तेथे आणल्याची माहिती पोलिसांना दिली.

adani group shares drop after hindenburg claim adani swiss bank accounts freeze
स्विस बँक खाती गोठवल्याचा ‘हिंडेनबर्ग’चा आरोप ; अदानी समभागांना झळ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
gst council decides to form new gom for health insurance premium
विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
एसटी प्रवाशांचा खोळंबा; गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, संपामुळे २५१ पैकी ५९ आगारांचे कामकाज ठप्प
213 flats in kalamboli kharghar and ghansoli most demanded in cidco maha housing lottery
सिडकोचे खारघरचे घर २ कोटींना; पहिल्याच दिवशी १२०० इच्छुकांची नोंदणी
japan flights cancel
‘या’ देशात एक कात्री गायब झाल्याने ३० हून अधिक उड्डाणे रद्द; नेमकं प्रकरण काय?
Family members appeal not to believe rumors about Badlapur harassment case
त्या चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित; अफवांवर विश्वास ठेवू नका, सहकाऱ्यांचे आवाहन

हेही वाचा – मुंबई : सुमारे आठ कोटींच्या कर फसवणुकीप्रकरणी कंपनीसह दोघांविरोधात गुन्हा

हेही वाचा – मुंबई : कामाठीपुऱ्यात ५८ मजली पुनर्वसित इमारती, तर विक्री योग्य इमारती असणार ७८ मजल्याच्या

गोवंडी परिसरातच या मोबाइलचे ईएमआय नंबर बदलले जात होते. त्यानुसार पोलिसांनी तीन आरोपींच्या माहितीवरून ईएमआय नंबर बदलणाऱ्या दुकानावर देखील याच वेळी छापा घातला. यावेळी पोलिसांनी असिफ शहा (३२) आणि जहांगीर जाहिद (२६) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देखील पोलिसांनी काही मोबाइल यावेळी जप्त केले. आशा प्रकारे या टोळीकडून पोलिसांनी १५ लाख ८९ हजारांचे एकूण १६२ मोबाइल जप्त केले आहेत. तसेच या टोळीत आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.