मुंबई : बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी रात्री कुर्ला परिसरातून अटक केली. आरोपीच्या ताब्यातून बिबट्याची कातडी हस्तगत करण्यात आली असून त्याबाबत गुन्हे शाखा कक्ष – ५ तपास करीत आहे.

गणेश रहाटे (४४) असे अटक आरोपीचे नाव असून तो प्रभादेवी परिसरातील रहिवासी आहे. गुन्हे शाखा कक्ष-५ चे प्रभारी अधिकारी घन:श्याम नायर यांना एक संशयीत व्यक्ती कुर्ला विद्याविहार येथे बिबट्याचे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तेथे सापळा रचला होता. त्यावेळी एक संशयीत व्यक्ती तेथे आला.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
19 absconded from Chitalsar police custody arrested from Lucknow in up
पोलीस कोठडीतून फरार झालेला उत्तर प्रदेशातून अटकेत

हेही वाचा…आरेमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा, विविध मागण्यांसाठी आदिवासी बचाव यात्रा

संशयावरून त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या बॅगेत एक प्राण्याचे कातडे आढळले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ते कातडे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वन्यजीव संरक्षक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी रहाटेला गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून १७८ सेमी लांब व ४१ सेमी रुंद कातडी जप्त करण्यात आले असून या बिबट्याची शिकार कोठे करण्यात आली, त्यात कोणकोण सहभागी होते, याबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे.