मुंबईः चिराबाझार येथील व्यापाऱ्याला अपघातात ठार मारण्याचा कट गुन्हे शाखेने शनिवारी उघडकीस आणला. याप्रकरणी लोकमान्य टिळक(एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यात केवळ अपघाताची नोंद करण्यात आली होती. पण आता याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचे कलम पोलिसांनी वाढवले आहे. आरोपींनी नुकतेच तक्रारदार व्यापाऱ्याच्या दुकानात शस्त्र ठेऊन त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. पण गुन्हे शाख कक्ष-९ च्या पथकाने हा कट उधळून लावत दोघांना अटक केली होती.

हेही वाचा >>> Mumbai Revenge Crime : मुंबईत बदला घेण्यासाठी तरुणाचे अपहरण, अर्धनग्न व्हिडिओ काढायला भाग पाडून लाखोंची लूट; दोघांना अटक

Mumbai dengue cases increased slightly while winter fever cases decreased
राज्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट तर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Ajit Pawar shares Memory of Manmohan Singh
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

चिराबाजार येथील व्यापारी किरणराज शाह (६७) यांच्या दुकानात पिस्तूल ठेऊन त्याला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-९ च्या पोलिसांनी नुकतीच निरंजन गुप्ता (३५) व त्याचा साथीदार केतन पारेख (४०) यांना अटक केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष-९ च्या पोलिसांनी आणखी सखोल तपास केला. त्यावेळी आरोपींनी तिसऱ्या साथीदाराच्या मदतीने शाह यांना यापूर्वीही मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. यावर्षी ११ नोव्हेंबरला आरोपींनी शाह यांचा अपघात झाला होता. त्याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी अपघाचा गुन्हा दाखल केला होता. पण आता तपासात व्यापाऱ्याचा अपघात घडवून त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एल.टी. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचे कलम वाढवले आहे.

हेही वाचा >>> कुर्ल्यात भंगार गोदामांना भीषण आग

या अपघातात आरोपी गुप्ता व पारेख यांच्यासह प्रशांत दिनेश केविटिया (२४) याचाही सहभाग असून त्याला एल.टी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रशांतला बोरीवली येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी कली असता त्याने गुन्हा मान्य केला आहे. आरोपीने गुन्ह्यांत वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यात आरोपींनी अपघाताबद्दल संभाषण असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्यावसायिक वादातून हा प्रकार घडला आहे. तक्रारदार शाह यांना खोट्या गुन्ह्यांत अडवकण्यासाठी दीड लाख रुपये मिळाले आहेत.

Story img Loader