खोटी बिले सादर करून विक्रीकर चुकविणाऱ्या १६०० व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे अर्थ व नियोजन खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी गुरुवारी विधानपरिषदेत जाहीर केले. अशा करबुडव्या व्यापाऱ्यांकडून आता पर्यंत ६९० कोटी रुपये वसूल करण्यात आले असून वसुली मोहीम अजून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते विनोद तावडे, अशिष शेलार, चंद्रकांत पाटील व भाई गिरकर यांनी मागील अधिवेशनात सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे संशयित हवाला व्यापाऱ्यांवर काय कारवाई केली, असा प्रश्न विचारला होता. त्यावर राजेंद्र मुळक यांनी सविस्तर उत्तर दिले. या संदर्भात विक्रीकर विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत ४१ हजार ८३२ लाभार्थी व्यापाऱ्यांनी सुमारे १५९५ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी ६९० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच ३९२ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे मुळक यांनी सांगितले.
करबुडव्या १६०० व्यापाऱ्यांवर गुन्हे
खोटी बिले सादर करून विक्रीकर चुकविणाऱ्या १६०० व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे अर्थ व नियोजन खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी गुरुवारी विधानपरिषदेत जाहीर केले.
First published on: 26-07-2013 at 03:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime case register against 1600 trader for to avoiding sales tax