भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण जिल्हा भाजपचे सरचिटणीस नंदू जोशी यांच्याविरोधात मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी पाच जणांवर संशयित आरोपी म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे.
महापालिकेतील सुरक्षारक्षक रमेश पौळकर (निलंबित) गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकरणी तक्रार करण्यासाठी प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर.पाटील, पोलीस महासंचालकांकडे त्यांनी या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. अनुसूचित जाती कायदा, नागरी हक्क संरक्षण कायद्याची कलमे चव्हाण व इतर आरोपींविरोधात लावण्यात आली आहेत.
पौळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ जानेवारी रोजी शोभा बहारे व इतर पाच जणांनी ‘तुम्हाला आमदार रवींद्र चव्हाण यांनी बोलाविले आहे, असे सांगून रामनगरमधील बालभवन येथे येण्यास सांगितले. तेथे आपण स्वत: भाऊ, वहिनी, बहिणीसोबत गेलो. तेथे आमदार चव्हाण यांनी आधीचआपल्या भावाला शिवीगाळ केली. स्वामी विवेकानंद शाळेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घे. नाहीतर तुला जगू देणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी आपणास संरक्षण देण्यात यावे. तसेच हा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या रामनगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पौळकर यांनी केली आहे.
भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा
भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण जिल्हा भाजपचे सरचिटणीस नंदू जोशी यांच्याविरोधात मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी पाच जणांवर संशयित आरोपी म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-06-2013 at 03:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime case registered against bjp mla ravindra chavan for using abusing language