महिलेला अश्लील संदेश आणि छायाचित्रे पाठविल्याप्रकरणी एका नामांकित कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावेश मेहता हे भारतातील सगळ्यात मोठय़ा आणि नामांकित कंपनीत उपमहाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. २०१३मध्ये एका शैक्षणिक संस्थेने करिअर मार्गदर्शनाची एक कार्यशाळा आयोजित केली होती. मेहता यांचे या कार्यशाळेत व्याख्यान ठेवण्यात आले होते. या संस्थेत काम करणाऱ्या ४० वर्षीय महिलेशी मेहता यांची ओळख झाली. ओळखीनंतर मेहता यांनी महिलेशी फोनवर संपर्क ठेवला होता. ते या महिलेस संदेश पाठवत होते. मात्र १० आणि ११ जून रोजी मेहता यांनी या महिलेस ‘व्हॉटस अ‍ॅप’ वर अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवले. याबाबत या महिलेने आपल्या संस्थेत तक्रार केली. मात्र संस्थेने दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर सोमवारी त्यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  मेहता फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले

Story img Loader