कापूरबावडी भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेलाच लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणास कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.  
रॉनी अल्फान्सो डिसोजा (३१), असे या तरुणाचे नाव असून तो नळपाडा भागात राहतो. पीडित महिलेचा पती गेली काही वर्षे परदेशात नोकरी करीत असल्याने ती कापूरबावडी भागात एकटीच राहते. याच संधीचा फायदा घेत रॉनीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असून या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
साकेत पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत मंगळवारी एका मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. योगेश रघुनाथ चौधरी (३४) असे त्याचे नाव असून तो खारेगाव परिसरात राहात होता. मंगळवारी रात्री योगेश मोटारसायकलवरून ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरून जात होता. त्या वेळी साकेत पुलाच्या अलीकडेच एका भरधाव वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रेयसीची आत्महत्या
प्रियकराने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच व्यथित झालेल्या प्रेयसीनेही आत्महत्या केल्याचा प्रकार भिवंडी शहरात बुधवारी घडला.
कामतघर परिसरात राहणारा प्रभुकुमार श्रीबेंदर जहा (१८) हा दहावीत शिकत होता. मंगळवारी घरगुती वादातून त्याच्या भावाने त्याची कानउघाडणी केली होती. त्याचा राग मनात धरून प्रभुकुमारने बुधवारी सकाळी वराळदेवी तलावात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती समजताच त्याची प्रेयसी पूजा मल्लेशाम कुट्टीवार (१६) हिनेही नैराश्यापोटी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटनांची नोंद भिवंडी व नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महिला सरपंच बेपत्ता
वार्ताहर, शहापूर : सरलांबे खरीवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नीरा जगन दिवे (२४) या बेपत्ता झाल्या असून या प्रकरणी त्यांचे पती जगन दिवे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  गेल्या दोन वर्षांपासून नीरा दिवे या सरलांबे खरीवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्या दहा दिवसांपूर्वी रास येथे माहेरी गेल्या होत्या. तेथून चार दिवसांपूर्वी त्या सासरी जाण्यासाठी निघाल्या, मात्र घरी परतल्याच नाहीत, अशी तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.