बनावट प्रमाणपत्रे तयार करणारी महिला अटकेत

मुंबई : लस घोटाळ्यातील सहभागासंबंधी गुडीया यादव नावाच्या महिलेस कांदिवली पोलिसांनी बुधवारी अटक के ली. यादवने लसीकरण झाल्याबद्दल बनावट प्रमाणपत्रे तयार करून टोळीस पुरवली, अशी माहिती तपासात निष्पन्न झाल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामार्फत लसीकरण शिबीर आयोजित करू, असे सांगत मुख्य आरोपी राजेश पांडे आणि त्याच्या साथीदारांनी शहरात नऊ ठिकाणी बनावट शिबिरे घेतली. हा प्रकार कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकु लातील रहिवाशांनी उघडकीस आणला. शिबीर आटोपल्यानंतर रहिवाशांच्या हाती पडलेल्या प्रमाणपत्रांवर अन्य रुग्णालये, वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांची नावे होती. रहिवाशांच्या नावांसह अन्य तपशीलही चुकीचे होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी कोकिलाबेन रुग्णालयाकडे चौकशी के ली. तेव्हा असे कोणतेही शिबीर घेतलेले नाही, असे रुग्णालयाने स्पष्ट के ले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा नोंदवून पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडे आणि त्याच्या टोळीने हिरानंदानी हेरिटेज गृहसंकु लातील रहिवाशांकडून लसीकरणासाठी प्रत्येकी १ हजार २५० रुपये आकारले होते.

कांदिवलीव्यतिरिक्त अंधेरी, वांद्रे येथील चित्रपटनिर्मितीशी संबंधित कं पन्यांनी दिलेल्या तक्रारीआधारेही याच टोळीविरोधात वर्सोवा, खार पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला. या दोन कं पन्यांनी पांडेच्या माध्यमातून आपल्या कर्मचारीवर्गासाठी शिबीर आयोजित के ले होते. हा सर्व प्रकार उघड होताच बोरिवलीतील ‘आदित्य कॉलेज ऑफ डिझाइन स्टडीज’ या महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळानेही या टोळीविरोधात पोलीस तक्रार के ली. या तक्रारीआधारे बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिली. प्रमुख आरोपी पांडे आणि डॉ. त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

पोलिसांचे आवाहन

बनावट लसीकरण, लस घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अशा प्रकारची कोणतीही संशयित घटना किं वा संशयित व्यक्तीबाबत माहिती असल्यास मुख्य नियंत्रण कक्ष (१००), २२६२५०२०, २२६२७९८३, २२६२३०५४ या दूरध्वनी क्र मांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Story img Loader