शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. याच ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व शिवसेना आमदारांचा मुक्काम आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य शिवसेना नेते उपस्थित होते. यावेळी सर्व आमदारांशी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांचा उल्लेख करत त्यांचं कौतुक देखील केलं आहे. भाजपा आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्याच्या भाषणावरुन त्यांचा शिवसेना नावाच्या संघटनेशी संबंध नव्हता असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पक्षप्रमुख म्हणून जे काही भाषण उद्धव ठाकरेंनी केले त्यांनी मनाला विचारून खरं सांगावं जे ते बोलत आहेत ते खरे आहे का. शिवसेनेच्या स्थापनेपासून ती उभी करेपर्यंत उद्धव ठाकरेंचा त्यांच्याशी काही संबंध नव्हता. तुम्ही कुठल्याही जुन्या शिवसैनिकाला विचारू शकता. हा माणूस कॅमेराच्या पलीकडे कधी बघायचा नाही. शिवसेना नावाच्या संघटनेशी यांचा काही संबंध नव्हता. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही धर्मनिरपेक्षतेचे जे बाप आहेत त्यांच्या कुशीत जाऊन हिंदुत्वाच्या बापाची का फसवणूक केली हेसुद्धा सांगितले पाहिजे. आजची शिवसेना ही शिवसैनिकांची, बाळासाहेबांची, आनंद दिघेंची राहिली आहे का याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे होते,” असे नितेश राणे यांनी टिव्ही ९ सोबत बोलताना म्हटले.

मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थानं करुन राज्य चालवता येत नाही – संजय राऊत

“आज शिवसेना अडीच वर्षे सत्तेत आहे. याकाळामध्ये मूळ शिवसैनिक कुठेही दिसतो का? दिसला असता तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अनिल देसाईंनी नाही एकनाथ शिंदेंनी केली असती. आजच्या कार्यक्रमामध्ये जुने शिवसैनिक बसले असते. सचिन अहिर यांच्याऐवजी जुन्या शिवसैनिकाला उमेदवारी दिली असती तर अब तक छप्पन बोलण्याचा अधिकार होता,” असेही नितेश राणे म्हणाले.

हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत – संजय राऊत

“शिवसेनेच्या ज्या आमदारांचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला ते पंतप्रधान मोदींच्या फोटोवर निवडून आले आहेत. केंद्र सरकार वाईट असेल तर स्वतःच्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी त्यांच्यापुढे पायघड्या कशाला घालता?,” असा सवालही नितेश राणेंनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism of nitesh rane on shivsena foundation day anniversary abn
Show comments