प्रसाद रावकर
मुंबई : मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळय़ासमोर ठेऊन राजकीय मंडळींच्या अट्टाहासापोटी शहरातील पदपथ, वाहतूक बेट, पुलांखालील मोकळय़ा जागा आदींच्या सुशोभीकरणासाठी विभाग कार्यालयांमार्फत २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये एकूण १४५ कोटी ७१ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. यापैकी तब्बल १३२ कोटी ४३ लाख रुपये २०२१-२२ मध्ये खर्च करण्यात आले आहेत. दरम्यान, जवळ आलेला पावसाळा लक्षात घेऊन अशा कामांसाठी आता पदपथांवर खोदकाम करण्यास मनाईचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन पदपथ, वाहतूक बेटे, पुलांखालील मोकळय़ा जागा आदींची दुरुस्ती अथवा सुशोभीकरण आदी कामांसाठी मोठय़ा प्रमाणावर निधीची तरतूद करून घेण्यात येते आणि ही कामे विभाग कार्यालयांच्या पातळीवर करण्यात येतात. त्यामुळे विभाग कार्यालयांतील अधिकाऱ्यांकडे ही कामे करण्यासाठी नगरसेवक तगादा लावतात.
मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. करोनामुळे मोठय़ा प्रमाणावर परप्रांतीय कामगार आपापल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे २०२०-२१ या वर्षांत अनेक नागरी कामे होऊ शकली नाहीत. या काळात पदपथ, वाहतूक बेटे, पुलांखालील मोकळय़ा जागा आदींच्या सुशोभीकरणाची कामेही रखडली होती. या कामांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र या कामांसाठी केवळ १३ कोटी २८ लाख रुपये खर्च झाले.
पदपथांच्या खोदकामास बंदी
निरनिराळय़ा कामांसाठी वारंवार पदपथांवर खोदकाम करण्यात येते. अनेक वेळा राजकारण्यांच्या मागणीनुसार पदपथांवरील पेव्हर ब्लॉक बदलण्यात येतात. सेवा उपयोगिता कंपन्यांच्या कामानिमित्त पदपथांवर खोदकामाचे गंडांतर येते. तसेच सुशोभीकरणाच्या नावाखाली पुन्हा पुन्हा त्याच पदपथांवर खोदकाम करुन निधीचा अपव्यय करण्यात येतो. वारंवार खोदकाम करण्यात येत असल्याने पादचारी, रहिवासी आणि दुकानदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बहुतांश कामे विभाग कार्यालयाच्या स्तरावर करण्यात येतात. त्यामुळे निधीचा अपव्यय होतोच, परंतु नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. पावसाळा जवळ येत आहे. त्यामुळे पदपथांवर खोदकाम करू नये, असे आदेश प्रशासनाने ई-मेलद्वारे उपायुक्तांसह सर्वच संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पदपथ, वाहतूक बेटे आदींच्या सुशोभीकरणावर १४५ कोटींची उधळपट्टी
करोनामुळे मोठय़ा प्रमाणावर परप्रांतीय कामगार आपापल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे २०२०-२१ या वर्षांत अनेक नागरी कामे होऊ शकली नाहीत. या काळात पदपथ, वाहतूक बेटे, पुलांखालील मोकळय़ा जागा आदींच्या सुशोभीकरणाची कामेही रखडली होती. या कामांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र या कामांसाठी केवळ १३ कोटी २८ लाख रुपये खर्च झाले.
पदपथांच्या खोदकामास बंदी
निरनिराळय़ा कामांसाठी वारंवार पदपथांवर खोदकाम करण्यात येते. अनेक वेळा राजकारण्यांच्या मागणीनुसार पदपथांवरील पेव्हर ब्लॉक बदलण्यात येतात. सेवा उपयोगिता कंपन्यांच्या कामानिमित्त पदपथांवर खोदकामाचे गंडांतर येते. तसेच सुशोभीकरणाच्या नावाखाली पुन्हा पुन्हा त्याच पदपथांवर खोदकाम करुन निधीचा अपव्यय करण्यात येतो. वारंवार खोदकाम करण्यात येत असल्याने पादचारी, रहिवासी आणि दुकानदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बहुतांश कामे विभाग कार्यालयाच्या स्तरावर करण्यात येतात. त्यामुळे निधीचा अपव्यय होतोच, परंतु नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. पावसाळा जवळ येत आहे. त्यामुळे पदपथांवर खोदकाम करू नये, असे आदेश प्रशासनाने ई-मेलद्वारे उपायुक्तांसह सर्वच संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दोन वर्षांचा खर्च
मुंबई महापालिका सभागृहाची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत असल्यामुळे पदपथ, वाहतूक बेटे, पुलांखालील मोकळय़ा जागांच्या सुशोभीकरणाच्या कामांसाठी २३१ कोटी ७४ लाख रुपयांची तरतूद करावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र, करोनामुळे वाढलेला खर्च लक्षात घेऊन प्रशासनाने २०२०-२१साठी ५० कोटी रुपये, २०२१-२२साठी १७५ कोटी रुपये, तर २०२२-२३ साठी ३६ कोटी रुपये अशी एकूण २६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत यापैकी अनुक्रमे १३ कोटी २८ लाख रुपये आणि १३२ कोटी ४३ लाख रुपये असे एकूण १४५ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले.
पदपथ, वाहतूक बेटे आदींच्या सुशोभीकरणावर १४५ कोटींची उधळपट्टी
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळय़ासमोर ठेऊन राजकीय मंडळींच्या अट्टाहासापोटी शहरातील पदपथ, वाहतूक बेट, पुलांखालील मोकळय़ा जागा आदींच्या सुशोभीकरणासाठी विभाग कार्यालयांमार्फत २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये एकूण १४५ कोटी ७१ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.
Written by प्रसाद रावकर

First published on: 24-05-2022 at 01:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crore wasted beautification of sidewalks transport islands mumbai municipal corporation amy