लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागडे उपचार सहज मिळावेत यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कक्षाकडून मागील काही दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून तब्बल ३२१ कोटी रुपये, तरआठ महिन्यांत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाकडून १२ कोटी ७३ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जाते. त्यानुसार मुंबई कार्यालयातील आतापर्यंत २९२ काेटी रुपयांहून अधिक, तर नागपूर कार्यालयातून २८ कोटी रुपये अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या आर्थिक मदतीमुळे ४० हजारांहून अधिक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झालेआहे. या कार्यालयांमार्फत अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रक्तशुद्धीकरण, कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश करण्यात आला आहे.

Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
cm Devendra fadnavis pa
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…
GST Council Meeting (1)
जीएसटी परिषदेची बैठक संपन्न! देशात काय स्वस्त, काय महागणार?
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
The importance of Girish Mahajan Vikhe Patil Dhananjay Munde is reduced
गिरीश महाजन, विखे-पाटील, धनंजय मुंडे यांचे महत्त्व कमी
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण खातेवाटप कधी होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…

हेही वाचा >>>कांदिवलीतील आकुर्ली पुल वाहतुकीसाठी खुला; पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार

त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने सुरू केलेल्या विशेष वैद्यकीय कक्षामार्फत जानेवारी ते ऑगस्ट २०२४ पर्यंत ३२३ रुग्णांना १२ कोटी ७३ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. हृदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफ्फुसाचे आजार, अस्थिरोग अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रीया यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रियेंचा समावेश आहे.

राज्यात धर्मादायअंतर्गत सुमारे ४६८ रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे १२ हजार खाटा गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, मुंबई, एच. एन. रिलायन्स, मुंबई, सह्याद्री हॉस्पीटल, पुणे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे इत्यादी रुग्णालयांचा समावेश असून सर्व धर्मादाय योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय कक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

हेही वाचा >>>परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा डिसेंबरमध्ये? पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास सुरूवात

कशी मिळवू शकता मदत

सद्यस्थितीत कक्षाचे कामकाज ऑफलाईन पध्दतीने सरू असून गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांना मदत मिळण्यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह आवश्यक कागदपत्रे charityhelp.dcmo @maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर मेल करू शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देवू शकतात, अशी माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी कसा कराल अर्ज

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही. सहायता कक्षाच्या ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून थेट मोबाइलवर अर्ज उपलब्ध करण्यात येतो.

Story img Loader