मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती, देखावे पाहण्यासाठी देशासह विदेशातील पर्यटकांची गर्दी होत आहे. गुरुवारपासून मुंबईत गणेशभक्तांची गर्दी वाढणार आहे. परिणामी खासगी दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्याही वाढणार असल्याने, ही वाहने उभी करण्यासाठी बेस्टने ‘पे ॲण्ड पार्क’व्यवस्था सुरू केली आहे.
हे ही वाचा…Best Bus : मुंबईकरांच्या ‘बेस्ट’ बचाव अभियानाचे देखावे
मुंबईत वाहन चालवण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी वाहन उभे करणे कठीण काम आहे. मुंबईतील रस्त्यावर वाहने उभी केल्यास, तत्काळ दंडात्मक कारवाई होते. गणेशोत्सव काळात अनेक रस्ते बंद केल्याने, पर्यायी मार्गावर वाहतूककोंडी होते आहे. त्यात रस्त्यावर वाहने उभी केल्यास, वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवणार आहे. त्यामुळे बेस्ट हा उपक्रम हाती घेतला. वडाळा येथील जीएसबी गणपती, राम मंदिर येथे भेट देणाऱ्यांना वडाळा आगार खुले केले आहे. ‘पे ॲण्ड पार्क’ सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले असून ही सुविधा १७ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत उपलब्ध असेल, असेही बेस्टकडून सांगण्यात आले.