लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून जोरदार शाब्दीक लढाई सुरू आहे. याची प्रचिती दसरा मेळाव्याच्या निमित्तानेही पाहायला मिळत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही गटांचा दसरा मेळावा वेगवेगळ्या ठिकाणी पार पडत आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा हा फोर्ट येथील आझाद मैदानात, तर ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दाखल होऊ लागले आहेत.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पोहोचण्यापूर्वी ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवसेना भवन येथे गर्दी करीत आहेत. ‘आवाज कुणाचा? शिवसेनेचा’, ‘ही ताकद कुणाची? शिवसेनेची’, ‘अरे कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला’, ‘मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’,“शिवसेना जिंदाबाद’ आदी घोषणांनी शिवसेना भवन परिसर दुमदुमून जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. ढोलकीच्या तालावर आणि टाळ्यांच्या कडकडाटात ही घोषणाबाजी होत आहे. गळ्यात भगवा शेला, डोक्यावर भगवी टोपी आणि हातात भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक नाचत शिवाजी पार्कच्या दिशेने जात आहेत. तर काही शिवसैनिक हा क्षण मोबाइलच्या कॅमेरात कैद करीत आहेत. शिवसेना भवनजवळ उभे राहून शिवसैनिक स्वतःची छायाचित्रे टिपत आहेत. तर सभास्थळी पोहोचल्यानंतर शिवसेना गीतावर कार्यकर्ते मनसोक्तपणे नाचत आहेत.

आणखी वाचा-मुंबई: निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांची सायबर फसवणूक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून कोणी खासगी बसने, गाडीने तर कोणी रेल्वेने सकाळीच मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात काही शिवसैनिकांनी मैदानातच क्षणभर विश्रांती घेतली आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी फिरत्या शौचालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तर ठाकरे गटाच्या अवजड वाहतूक सेनेतर्फे अन्न व सरबत वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून हळूहळू गर्दी वाढत आहे.

Story img Loader